-
Ganeshotsav 2022 : दहा दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी सर्वत्र लगबग सुरु आहे. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
मुंबईतील ठिकठिकाणच्या गणेश कार्यशाळांमध्ये साकारलेल्या गणेशमूर्ती रविवारी (२१ ऑगस्ट) सार्वजनिक मंडळांनी वाजतगाजत मंडपस्थळी आणल्या. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
फटाक्यांची आतशबाजी, ढोल-ताशाच्या गजरात गणरायाचे आगमन झाल्याने वातावरण भक्तीमय झाले. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
मिरवणुकांमुळे अधिक संख्येने मूर्तीकार्यशाळा असलेल्या लालबाग, परळ आदी भागांतील वाहतुकीचे पोलिसांना सकाळपासूनच नियोजन करावे लागले. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
करोनामुळे भाविकांना गेली दोन वर्षे कडक निर्बंधांत गणेशोत्सव साजरा करावा लागला होता. (फोटो – गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
मात्र यंदा संसर्ग नियंत्रणात आल्यामुळे राज्य सरकारने सर्वच निर्बंध हटविले आहेत. (फोटो – गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
परिणामी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. (फोटो – गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
मुंबईमधील लालबाग, परळ आणि परिसरातील मूर्ती कार्यशाळांमध्ये साकारलेल्या उंच गणेशमूर्ती रविवारी सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपस्थळी रवाना झाल्या. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
मंडळांच्या कार्यकर्त्यांनी यानिमित्ताने फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशाच्या गजरात, गुलालाची उधळण केली. (फोटो – गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
३१ ऑगस्ट रोजी गणेशोत्सव सुरू होत आहे. (फोटो – अरुल होरायझन, इंडियन एक्सप्रेस)
-
त्यामुळे मुंबईतील बहुतांश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी २१ ऑगस्ट रोजी सुट्टीचा मुहूर्त साधत मूर्ती मंडपस्थळी आणल्या. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
गणेश आगमनाच्या मिरवणुकांमुळे लालबाग, परळ आणि परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी होती. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. (फोटो – गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
लालबाग, परळ भागात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन येथील वाहतून अन्य मार्गाने वळविण्यात आली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. (फोटो – अरुल होरायझन, इंडियन एक्सप्रेस)
-
मुंबईमध्ये रविवारी मोठ्या संख्येने गणेश आगमनाच्या मिरवणुका निघण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. (फोटो – गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”