-
Lalbaugcha Raja 2022 First Look : आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत.
-
अवघ्या मुंबईकरांचे श्रद्धास्थान असणाऱ्या ‘लालबागचा राजा’ देखील भक्तांना दर्शन देण्यासाठी सज्ज झाला आहे.
-
काल दि. २९ ऑगस्ट रोजी ‘लालबागचा राजा’चा प्रथम दर्शनाचा सोहळा पार पडला.
-
यावेळी असंख्य भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.
-
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं हे ८९ वं वर्ष आहे.
-
गणेशोत्सवात ‘लालबागचा राजा’चे दर्शन घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून त्याचबरोबर परदेशातूनही भाविक मुंबईमध्ये येत असतात.
-
भाविकांसाठी ‘Lalbaugcha Raja’ या युट्यूब चॅनेलवरून ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
-
करोनानंतर तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा होणार आहे.
-
भक्तांच्या लाडक्या मुंबईतील लालबागच्या राजाचेही यंदा दर्शन घेता येणार असल्यामुळे भाविकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
-
दोन वर्षांनंतर लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन त्याचे तेज पुढील वर्षभर डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी भाविक आतुर आहेत.
-
गणपती बाप्पा मोरया… (फोटो – प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”