-
मुंबईतील गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण असते ते वेगवेगळ्या आकाराच्या आणि उंचीच्या गणेश मूर्ती
-
दोन वर्षाच्या कालखंडानंतर निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत आहे
-
उत्साहात गणेशोत्सव साजरा केल्यानंतर आता विसर्जन सोहळाही तेवढ्याच दणक्यात सुरु झाला आहे
-
मुंबईत विविध ठिकाणी गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते
-
त्यापैकी गिरगाव चौपाटी इथला विसर्जन सोहळा हा सर्वात मोठे आकर्षण असतो
-
संध्याकाळपासून इथे दक्षिण मुंबईतील गणेश मूर्तींचे विसर्जनासाठी आगमन व्हायला सुरुवात होते
-
विसर्जन सोहळा सुरळीत व्हावा यासाठी विविध स्तरावर यंत्रणा कार्यरत असतात
-
भर समुद्रात हेलिकॉप्टरच्या माध्यमातून नजर ठेवत या सोहळ्याला गालबोट लागू नये याची काळजी घेतली जाते
-
दिवस मावळेपर्यंत भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टरची गस्त गिरगाव चौपाटीसह मुंबईत विविध चौपाटीच्या ठिकाणी सुरु असते ( वरील सर्व फोटोंसाठी सौजन्य – भारतीय नौदल )

Daily Horoscope: हनुमान जयंतीला मारुतीराया कोणाला देणार बळ? राशीनुसार ‘ही’ कामं केल्यास तुमचाही दिवस ठरेल फायद्याचा