-
करोना महामारीनंतर यावर्षी कोणत्याही निर्बंधांविना धुमधडाक्यात आणि जल्लोषात गणेशोत्सव साजरा झाला.
-
दहा दिवस भक्तीभावे पूजा करून लाडक्या गणारायाला भक्तांनी वाजत-गाजत निरोप दिला.
-
पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे ढोल-ताशाच्या गजरात कृत्रिम तलावात शुक्रवारी(९ सप्टेंबर) विसर्जन करण्यात आले.
-
लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणुकीला आज सकाळी सहाच्या आसपास सुरुवात झाली.
-
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणुकीसाठी खास रथ तयार करण्यात आला होता.
-
अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
-
विशेष म्हणजे आजही पुण्यातील चौकाचौकात गणरायाला निरोप देण्यासाठी गर्दी जमलेली पाहायला मिळाली.
-
दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी लाखोंनी जनसागर जमला होता.
-
पुण्यातील अखिल मंडई मंडळातील गणेश मूर्तीचेदेखील आज विसर्जन करण्यात येणार आहे.
-
अखिल मंडई मंडळ गणपतीच्या मिरवणुकीतही भाविकांकडून मोरयाचा जयघोष केला जात होता.
-
(सर्व फोटो : अरुल होरायझोन, इंडियन एक्सप्रेस)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…