-
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल (शुक्रवार) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया(पीएफआय)च्या आंदोलनावेळी काहींनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्याचा प्रकार समोर आला. याच्या निषेधार्थ आज मनसेकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली. (सर्व फोटो-सागर कासार)
-
मनसेचे नेते अजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अलका टॉकीज चौकात आंदोलन करण्यात आले.
-
यावेळी मनसे कार्यकर्त्यांकडून रास्ता रोकोचाही प्रयत्न झाला.
-
मोठ्यासंख्येन मनसेचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षाचे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरले होते.
-
विशेष म्हणजे या आंदोलनात महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांचाही मोठा सहभाग दिसून आला.
-
वंदे मातरम.., पाकिस्तान मुर्दाबाद, पीएफआय मुर्दाबाद… अशी घोषणाबाजी करण्यात आली.
-
याशिवाय पाकिस्तानचा झेंडा मनसे कार्यकर्त्यांनी जाळला.
-
तर काहींनी पाकिस्तानच्या झेंड्याचे पोस्टर जाळून संताप व्यक्त केला.
-
मोठ्यासंख्येने जमाव रस्त्यावर उतरल्याने पोलीस प्रशासनांचीही चांगलीच धावपळ झाल्याचे दिसून आले.
-
मनसेकडून राज्यभरात अनेक ठिकाणी आज आंदोलन केले जात आहे.
-
यावेळी मनसेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी पीएफआय विरोधी घोषणाबाजीही केली.
-
कालच्या प्रकारानंतर मनसेने केलेल्या आजच्या या आंदोलनाची शहरात सर्वत्र चर्चा होत आहे.

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी