-
शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरूवात झाली आहे. गेले दोन वर्ष करोनामुळे सगळेच सण-उत्सव साधेपणाने साजरे करण्यात आले.
-
परंतु, यावर्षी कोणत्याही निर्बंधांविना उत्सव साजरे होत असल्यामुळे भाविकही आनंदात आहेत.
-
ठाण्यातही नवरात्रोत्सवाची धामधूम पाहायला मिळते. आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभीनाका येथील देवीची दरवर्षी मोठ्या श्रद्धेने पूजा केली जाते.
-
१९७८ सालापासून सुरू करण्यात आलेल्या टेंभीनाका येथील नवरात्रोत्सवाची फार मोठी परंपरा आहे.
-
अंबे धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या वतीने दरवर्षी टेंभीनाका येथे मोठ्या उत्साहाने नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो.
-
महाराष्ट्राला ठाणे जिल्ह्याचे मुख्यमंत्री मिळाल्याने यावर्षी ठाण्यातील नवरात्रोत्सवातील उत्साह पाहण्यासारखा असणार आहे.
-
घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टेंभीनाका येथील नवरात्रोत्सव मंडळाला भेट दिली.
-
शिंदेंनी स्वत: नवरात्रोत्सव मंडळातील दुर्गेश्वरी मातेच्या सभा मंडपाच्या कामाची पाहणी केली.
-
यावर्षी दुर्गेश्वरीच्या स्वागतासाठी खास शिखर मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे.
-
यावेळी त्यांच्यासह ठाणे जिल्हाप्रमुख, शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के, शहरप्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक, टेंभीनाका शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख निखिल बुडजडे तसेच शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
-
(सर्व फोटो : एकनाथ शिंदे, दुर्ग दुर्गेश्वरी टेंभीनाका/ इन्स्टाग्राम)

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”