-
नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उत्सवाला सुरूवात झाली आहे. या नऊ दिवसात भक्तीभावाने देवीची पूजा केली जाते. (फोटो : Pexels)
-
नवरात्रीमध्ये अनेकजण जम्मू काश्मीर येथील वैष्णोदेवीचे दर्शन घेण्यासाठी जातात. यावर्षीदेखील अनेक भक्तगण देवीचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले आहेत.
-
वैष्णोदेवीच्या मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
-
मंदिराला करण्यात आलेली रोषनाई अलौकिक अनुभूती देणारी आहे.
-
नवरात्रीदरम्यान होणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी मंदिर परिसरात ठिकठिकाणी मंडप उभारण्यात आले आहेत.
-
सणाच्या दिवसात मंदिर परिसरात जास्त गर्दी होण्याची शक्यता असते. यासाठी भाविकांच्या सुरक्षेबाबत तेथील पोलीस यंत्रणेने सर्व पुर्वतयारी केलेली दिसत आहे.
-
भाविकांच्या सुरक्षेसाठी वर्दीमध्ये नसलेले अधिकारी ठिकठिकाणी पाळत ठेवत आहेत.
-
(उर्वरित फोटो सौजन्य : ANI)
Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…