-
नवरात्रोत्सवानमित्त ठाण्यामधील टेंभी नाक्यावरील देवीच्या दर्शनासाठी व महाआरतीसाठी आज शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी उपस्थिती लावली. (फोटो – नीलेश पानमंद / सचिन देशमाने )
-
रश्मी ठाकरे आल्यानंतर देवीच्या मंडपात शिवसेनेच्या महिला आघाडीकडून जोरदार घोषणाबाजी केली गेली.
-
रश्मी ठाकरे आरतीसाठी हजर झाल्यानंतर उपस्थित महिलांनी उद्धव ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है… अशी घोषणा दिली.
-
याचबरोबर आदित्य ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है.. अशीही घोषणा देण्यात आली.
-
जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद असं म्हणत महिला कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.
-
तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो.. अशी देखील घोषणा वारंवार दिली गेली.
-
जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव… अशा घोषणांनी अवघा सभामंडप दुमदुमून गेला होता.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्यामधील वादामुळे आधीच टेंभी नाक्याचा नवरात्रोत्सव यंदा अधिक चर्चेत आहे.
-
शिंदे आणि विचारे यांचे राजकीय गुरु आनंद दिघेंनी सुरु केलेल्या या उत्सवाला रश्मी ठाकरे हजेरी लावणार असल्याने सकाळपासून महिलांची मोठ्याप्रमाणावर गर्दी झाली होती.
-
सर्वसामान्याप्रमाणेच राजकीय वर्तुळात देखील आजच्या या महाआरतीची सकाळपासून चर्चा होती.
-
तर गर्दी गोळा करण्यासाठी मुंबईतून महिला आणल्या जातील अशी शक्यता शिंदे गटाने व्यक्त केली होती.
-
शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी रश्मी ठाकरेंच्या ठाण्यातील या दौऱ्यासंर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना गर्दी जमवण्याचा प्रयत्न या निमित्ताने ‘शिल्लक सेने’कडून केला जाईल असं म्हटलं होते.
-
शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील शिवसेना नेते व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती
-
अगोदर मंत्रोच्चारात पूजा आणि नंतर रश्मी ठाकरे यांनी देवीची आरती केली.
-
प्रसारमध्यमांच्या प्रतिनिधींचीही यावेळी मोठ्याप्रमाणावर गर्दी झाली होती.

रीलसाठी थेट रेल्वे रुळावर झोपली! तेवढ्यात भरधाव वेगात ट्रेन आली अन्…, VIDEO पाहून बसेल धक्का