-
धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यातील टेंभीनाक्यामध्ये सुरू केलेल्या नवरात्रोत्सव मंडळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब भेट दिली.
-
पंचमीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी सपत्निक पूजा केली. एकनाथ शिंदे यांचे पूत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नीने मनोभावे दुर्गा देवीची पूजा-अर्चना केली.
-
टेंभीनाक्यातील जय अंबे धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या नवरात्रोत्सव मंडळात मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब दुर्गा देवीची विधिवत पूजा केली.
-
१९७८ सालापासून सुरू करण्यात आलेल्या टेंभीनाका येथील नवरात्रोत्सवाची फार मोठी परंपरा आहे.
-
जय अंबे धर्मादाय विश्वस्त संस्थेच्यावतीने दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी करोना निर्बंधाशिवाय नवरात्रोत्सव साजरा होत असल्याने भक्तांमध्ये उत्साह संचारला आहे.
-
धर्मवीर आनंद दिघे यांना देवीचा साक्षात्कार झाला होता असे बोलले जाते. या साक्षात्कारानुसार दिघेंनी मूर्ती बनवून घेतली. तशीच मूर्ती आजतागायत घडवली जात आहे.
-
आनंद दिघे यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभीनाक्यामधील नवरात्रोत्सवाची परंपरा कायम ठेवली आहे.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते टेंभीनाक्यामधील देवीची आरती करण्यात आली
-
(फोटो सौजन्य- खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या इन्स्टाग्रामवरुन)

महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन