-
दक्षिण कोरियाची राजधानी सियोलमध्ये ‘हॅलोवीन’ उत्सवादरम्यान झालेल्या चेगराचेंगरीत १४० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. या दूर्घटनेत जवळपास दीडशे लोक जखमी झाले आहेत.
-
इटावॉन लेजर जिल्ह्यात शनिवारी रात्री ही भयानक घटना घडली आहे. ‘हॅलोवीन’ उत्सवादरम्यान हॅमिल्टन हॉटेलजवळील एका अरुंद रस्त्यावर मोठी गर्दी जमली होती.
-
या गर्दीतील लोकांनी एकमेकांना ढकलण्यास सुरुवात केली. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल ५० जणांना हृदयविकाराचा झटका आला.
-
दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून यांनी राष्ट्रीय शोक कालावधीची घोषणा केली आहे.
-
या विदारक घटनेनंतर दक्षिण कोरियातील ‘हॅलोवीन’सह सर्व उत्सव आणि परेड रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती ‘योनहाप’ वृत्तसंस्थेनं दिली आहे.
-
कोरियातील या भीषण घटनेनंतर दिल्लीतील कोरियन दुतावासातील राष्ट्रध्वज अर्ध्यावर करण्यात आला.
-
“गर्दीमध्ये जेव्हा लोक खाली कोसळतात तेव्हा ते उठण्याचा प्रयत्न करतात. उठताना पाय आणि हातावर ताण पडतो. याच वेळी मेंदूला मिळणारा रक्तप्रवाह कमी होत जातो. त्यानंतर ३० सेकंदांमध्ये व्यक्ती बेशुद्ध होऊ शकतो”, अशी माहिती इंग्लंडमधील ‘सुफोन’ विद्यापीठातील क्राऊड सायन्सचे प्राध्यापक जी कैथ स्टिल यांनी दिली आहे.
-
गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण होते, तेव्हा बहुतांश लोक हे गुदमरून मरतात. अशा प्रसंगी श्वास घेता न आल्यामुळे बऱ्याच लोकांचा मृत्यू होतो.
-
दोन वर्ष करोनामुळे जगभरात सण-उत्सवांवर सरकारने निर्बंध लादले होते. हे निर्बंध उठताच नागरिकांनी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये गर्दी करायला सुरुवात केली आहे.
-
या कठीण प्रसंगात भारत दक्षिण कोरियाच्या मदतीसाठी तत्पर असल्याचं परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे.
-
याच महिन्यात इंडोनेशियामध्ये एका स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये १३१ जणांचा मृत्यू झाला होता. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यातदेखील अमेरिकेतील टेक्सासमधील ह्यूस्टन येथे अशीच घटना घडली होती.
-
(सर्व फोटो-एएनआय)

‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई