-
कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरमध्ये वारकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती.
-
महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी वारीनिमित्त शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते पार पडली.
-
विठ्ठल भेटीनंतर वारकरी आपापल्या गावी परतले. मात्र त्यानंतर पंढरपुरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली होती.
-
पंढरपुरातील अस्वच्छता दूर करण्यासाठी सांगलीतील निर्धार फाउंडेशनच्या १०० स्वच्छता दूतांनी चंद्रभागा नदीच्या काठी स्वछता मोहीम राबविली.
-
सांगली येथून दोन एसटी बसमधून १०० स्वच्छता दूत पंढरपूरकडे स्वच्छतेसाठी रवाना झाले होते.
-
निर्धार फाउंडेशनचे हेच १०० स्वच्छता दूत आहेत, ज्यांनी पंढपूरमध्ये स्वच्छता मोहीम राबविली.
-
सकाळी अकरा ते सायंकाळी चार या वेळेत चंद्रभागा नदीकाठी असलेल्या घाटावरून ३ टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले.
-
चंद्रभागा नदीच्या घाटावर निर्माल्य, माती, चिखल, जुने कपडे, फोटो इत्यादी वस्तू पसरलेल्या होत्या. त्या घाटाचा परिसर स्वच्छता दूतांनी स्वच्छ केला.
-
पांडुरंगाच्या चरणी एक वेगळ्या पद्धतीने भक्ती अर्पण करावी व प्रशासनाला सहकार्य करावे या दोन्ही हेतूने निर्धार फाउंडेशनने सांगलीची स्वच्छता वारी पांडुरंगाच्या दारी ही अनोखी मोहीम हाती घेतली होती.