-
विठ्ठल भेटीनंतर वारकरी आपापल्या गावी परतले. मात्र त्यानंतर पंढरपुरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली होती.
-
पंढरपुरातील अस्वच्छता दूर करण्यासाठी सांगलीतील निर्धार फाउंडेशनच्या १०० स्वच्छता दूतांनी चंद्रभागा नदीच्या काठी स्वछता मोहीम राबविली.
-
सांगली येथून दोन एसटी बसमधून १०० स्वच्छता दूत पंढरपूरकडे स्वच्छतेसाठी रवाना झाले होते.
-
निर्धार फाउंडेशनचे हेच १०० स्वच्छता दूत आहेत, ज्यांनी पंढपूरमध्ये स्वच्छता मोहीम राबविली.
-
सकाळी अकरा ते सायंकाळी चार या वेळेत चंद्रभागा नदीकाठी असलेल्या घाटावरून ३ टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले.
-
चंद्रभागा नदीच्या घाटावर निर्माल्य, माती, चिखल, जुने कपडे, फोटो इत्यादी वस्तू पसरलेल्या होत्या. त्या घाटाचा परिसर स्वच्छता दूतांनी स्वच्छ केला.
-
पांडुरंगाच्या चरणी एक वेगळ्या पद्धतीने भक्ती अर्पण करावी व प्रशासनाला सहकार्य करावे या दोन्ही हेतूने निर्धार फाउंडेशनने सांगलीची स्वच्छता वारी पांडुरंगाच्या दारी ही अनोखी मोहीम हाती घेतली होती.
एका किसिंग सीनसाठी बॉलीवूड अभिनेत्याने घेतलेले तब्बल ३७ रिटेक, अभिनेत्रीला जबाबदार धरत म्हणालेला, “ती जाणूनबुजून…”