-
रिपब्लकिन पक्षाचे नेते आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत.
-
आगामी २०२४ मध्ये ही निवडणूक होणार आहे. त्यासाठी आत्तापासूनच ट्रम्प तयारीला लागले आहेत. त्यांनी आपल्या उमेदवारीची सर्व कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे सादर केली आहेत.
-
अमेरिकेला पुन्हा एकदा महान बनवण्यासाठी ही निवडणूक लढवणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
-
फ्लोरिडामध्ये ट्रम्प यांनी आपल्या उमेदवारीची घोषणा केली आहे. त्यांनी आत्तापर्यंत दोनदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवली आहे.
-
डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा करताच जल्लोष करताना ट्रम्प समर्थक…
-
२०१६ साली झालेली अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक डोनाल्ड ट्रम्प यांनी जिंकली होती. त्यानंतर २०२० साली पार पडलेल्या निवडणुकीत जो बायडन यांनी त्यांचा पराभव केला.
-
दरम्यान, अमेरिकेत नुकत्याच पार पडलेल्या मध्यावधी निवडणुकांमध्ये रिपब्लकिन पक्षाने निराशाजनक कामगिरी केली आहे.
-
पत्नी मेलानिया यांच्यासोबत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प…
-
डोनाल्ड ट्रम्प यांचे पुत्र इरिक आणि त्यांच्या पत्नी लारा ट्रम्प. (सर्व फोटो-एपी)

‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक