-
पीएमव्ही कंपनीने आपली EaS – E ही कार भारतीय ग्राहकांसाठी लाँच केली आहे. विशेष म्हणजे, या ई कारची किंमत केवळ ४.७९ लाख रुपये आहे. (source – Pradeep Pawar, loksatta.com)
-
ईएएस ई ही २ सीटर माइक्रो इलेक्ट्रिक कार आहे. यामध्ये दोन व्यक्तींसह एक लहान मुलगा बसू शकतो. इलेक्ट्रिक सेगमेंटमधील ती सर्वात छोटी इलेक्ट्रिक कार असून ती सर्वात स्वस्तही आहे. (source – Pradeep Pawar, loksatta.com)
-
कारची किंमत ४.७९ लाख रुपयांपासून (एक्स शोरूम) सुरू होते. मात्र, ही किंमत सुरुवातीच्या १० हजार ग्राहकांसाठीच ठरवलेली असून त्यानंतर किंमत वाढण्याची शक्यता आहे. (source – Pradeep Pawar, loksatta.com)
-
ग्राहक कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ही कार बुक करू शकतात. कंपनी बुकिंगसाठी दोन हजार रुपयांचे टोकन अमाउंट घेत आहे. (source – Pradeep Pawar, loksatta.com)
-
पीएमव्ही ईएएस ई ही देशातील सर्वात लहान इलेक्ट्रिक कार आहे. (source – Pradeep Pawar, loksatta.com)
-
कारची लांबी २९१५ मिमी, रुंदी ११५७ मिमी आणि उंची १६०० मिमी आहे. कारमध्ये १७० मिमीचा ग्राउंड क्लिअरेन्स मिळतो.(source – Pradeep Pawar, loksatta.com)
-
कारचे इंटेरिअर अनोखे आहे. कारचे ड्रायव्हिंग व्हील मध्यभागी आहे. (source – Pradeep Pawar, loksatta.com)
-
कारमध्ये ४ जी एनेबल्ड कनेक्टिव्हिटी आणि राडिंग मोड असलेली इन्फोटेन्मेंट स्क्रीन देण्यात आली आहे. (source – Pradeep Pawar, loksatta.com)
-
कार फुल चार्जनंतर १२० ते २०० किमी पर्यंतची रेंज देणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. (source – Pradeep Pawar, loksatta.com)
-
कारमधील बॅटरी ४ तासांत फुल चार्ज होत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. (source – Pradeep Pawar, loksatta.com)
-
रिमोट पार्किंग असिस्ट, क्रुझ कंट्रोल, ब्ल्युटूथ कनेक्टिव्हिटी, ऑनबोर्ड नेव्हिगेशन, असे फीचर देण्यात आले आहेत. (source – Pradeep Pawar, loksatta.com)
-
ही कार कोणत्याही १५ ए आउटलेटने चार्ज होऊ शकते. कंपनीकडून ३ किलो वॉट एसी चार्जर दिला जात आहे. (source – Pradeep Pawar, loksatta.com)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य