-
जगातील सर्वांत उंच आणि कठीणातील कठीण असलेला माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प (५३६४ मीटर) ठाण्यातील आठ वर्षीय गृहिता विचारे या छोट्या हिरकणीने यशस्वीरित्या सर केला आहे.
-
गृहिताच्या वडिलांना यांना गिर्यारोहणाची आवड असल्याने ते मोठ्या गिर्यारोहण गटाबरोबर विविध किल्ले, शिखरावर जातात.
-
इतक्या लहान वयातील तिच्या या कामगिरीचे सर्वच स्तरातून तिचे कौतुक केले जात आहे.
-
काही महिन्यांपूर्वीच गृहिताने नऊवारी साडी नेसून नवरा-नवरी हे कठीण सुळके सर केले होते. याबद्दल तिला इंडिया बूक ॲाफ रेकाॅर्डने सन्मानित करण्यात आले होते.
-
गृहिता ही राज्यातील पहिली सर्वात लहानगी आहे, जिने हे बेस कॅम्प ट्रेक पूर्ण केले आहे. तर देशात ती दुसरी आहे.
-
हरिता विचारे तिची मोठी बहीण ही सुद्धा गिर्यारोहणाचा एक भाग होती .
-
हा ट्रेक करण्यापूर्वी महिनाभर गृहीताकडून जिने चढणे-उतरणे , शनिवार-रविवारी डोंगर चढणे-उतरणे करणे असे व्यायाम करून घेण्यात आले.
-
तापमान , थंडगार वारा , उंच चढण अशी अनेक आव्हाने गृहितासमोर होती. मात्र तिने ती सहजपणे पार केली.
-
काहीही झाले तरी ते उंच टोक गाठायचं म्हणजे गाठायचच अशी जिद्द उराशी बाळगून गृहिताने ती उंची गाठण्याचे यश संपादन केले.
आजचे राशिभविष्य: मार्च महिन्याचा पहिला दिवस तुमच्यासाठी कसा असणार? ‘या’ राशींना जोडीदाराची उत्तम साथ व भागीदारीत होईल लाभ