-
एअर शोमध्ये सूर्यकिरण एरोबॅटिक आणि सारंग हेलिकाॅप्टरच्या चमूने केलेल्या चित्तथरारक कसरतींनी नागपुरकरांना भुरळ घातली.
-
एअरोमॉडेलिंग शो, वायुसेनेच्या बॅण्डचे सादरीकरण या कार्यक्रमातील विशेष आकर्षण होते.
-
सूर्यकिरण एरोबॅटिक टीम, सारंग हेलिकॉप्टर, ॲवरो, आकाशगंगा, एअर वॉरिअर्स ड्रिल टीम, एनसीसी ग्लायडर्स आदींचा समावेश या एअर शो मध्ये होता.
-
वायुसेना नगरातील मेंटेनन्स कमांडच्या परेड मैदानावर निमंत्रितांना हवाई थरार अनुभवता आला.
-
डॉर्नियर विमानातून आठ हजार फूट उंचीवर स्कायडायव्हिंग करण्यात आले. या चित्तथरारक प्रात्यक्षिकाने नागपूरकर थक्क झाले.
-
‘आकाशगंगा’ या पथकाच्या १० सदस्यांनी ८ हजार फूट उंचावर या हवाई कसरती आणि प्रात्यक्षिके सादर केली.
-
इतर उपक्रमांमध्ये पॅरा हँड ग्लाइडिंग, वाहतूक आणि लढाऊ विमानांद्वारे फ्लायपास्ट, आयएएफ उपकरणांचे प्रदर्शन, एरो- मॉडेलिंग आणि एअर फोर्स बँडचे सादरीकरण झाले.
-
ॲवेरो हे मध्यम आकाराचे वाहतूक विमान जमिनीपासून ५०० फूट उंचीवर उडत होते.
-
लढाऊ आणि मालवाहतूक करणाऱ्या विमानांची प्रात्यक्षिके पाहण्यासाठी नागरिकांनी आजूबाजूच्या घरांच्या छतांवर गर्दी केली होती.

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड