-
जगातील सर्वात मोठं विमान मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं आहे.(फोटो सौजन्य- CSMIA ट्विटर)
-
‘A 300-600 ST एअरबस बेलुगा’ हे मालवाहू विमान विमानतळावर उतरताच त्याची भव्यता पाहून प्रवासी अवाक झाले.(फोटो सौजन्य- CSMIA ट्विटर)
-
अत्यंत वेगळ्या आकारातील या विमानाची मालवाहू क्षमता ५१ टन आहे.(फोटो सौजन्य- CSMIA ट्विटर)
-
या विमानाच्या अनोख्या डिझाईनबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला सांगा, असा सवाल विमानतळ कर्मचाऱ्यांनी ट्विटरवर नेटकऱ्यांना विचारला आहे.(फोटो सौजन्य-एक्स्प्रेस)
-
विमानाच्या सुट्या भागासह इतर मालाची वाहतूक करणाऱ्या या विमानाचा आकारा व्हेल माशासारखा आहे.(फोटो सौजन्य- CSMIA ट्विटर)
-
या भव्यदिव्य विमानाची छायाचित्र प्रवाशांनी अनेक मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट्सवर टाकली आहेत.(फोटो सौजन्य- CSMIA ट्विटर)
-
मुंबई विमानतळावर या सुपर ट्रान्सपोर्टर विमानाने पहिल्यांदाच हजेरी लावली आहे.(फोटो सौजन्य-एक्स्प्रेस)
-
विमानाची सरासरी लांबी ५६ मीटर तर उंची १७ मीटर आहे.(फोटो सौजन्य-एक्स्प्रेस)
-
जगातील सर्वात आकर्षक आणि आलिशान ‘एम्ब्रेअर E195-E2’ हे विमानदेखील मुंबई विमानतळावर उतरले आहे.(फोटो सौजन्य-एक्स्प्रेस)

Devendra Fadnavis : ‘मी शिंदेंना सांगणार, कडक समज द्या, अन्यथा…’, संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून फडणवीसांचा मोठा इशारा