-
फळांचा राजा आंबा हा आपल्या सगळ्यांच्या आवडीचा. यावर्षीच्या हंगामातील पहिल्या आंब्यांची दमदार एन्ट्री मुंबईच्या बाजारात झाली आहे.
-
मुंबईमधील वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये या हंगामातील पहिले आंबे विक्रीसाठी दाखल झाले आहेत.
-
दरवर्षी या आंब्यांची सर्वजण आतुरतेने वाट पाहतात. विशेषतः हापूस आंब्याला सर्वांची पसंती मिळते.
-
एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झालेले हे आंबे देवगड येथील आहेत.
-
देवगड तालुक्यातील, काजवन गावातून प्रशांत शिंदे आणि दिनेश शिंदे या भावांनी या हंगामातील आंब्याची पहिली पेटी पाठवली आहे.
-
या हंगामातील हे पहिले आंबे विक्रीसाठी आले असल्याने, या आंब्यांची पूजा करण्यात आली.
-
ही पहिली आंब्याची पेटी सिद्धीविनायक बाप्पाच्या चरणी अर्पण केली जाणार आहे.
-
या आंब्यांना चांगला भाव मिळो यासाठी एपीएमसी मार्केटमधील सदस्यांकडुन मालवणी पद्धतीने गाऱ्हाण घालण्यात आले.
-
या २ डझन आंब्यांची किंमत ९ हजार रुपये इतकी आहे. (Express Photo : Narendra vaskar)

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला धक्का; चीनच्या वस्तूंवर लादला १०४ टक्के आयात कर, ‘व्हाईट हाऊस’कडून मोठी घोषणा