-
टोयोटा कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी टोयोटा इनोव्हा हायक्रॉस एमपीव्ही सादर केली आहे. (source – toyota)
-
अधिक आसन क्षमता आणि आलिशान बैठक व्यवस्थेमुळे टोयोटा क्रिस्टा हे मॉडेल आधीच ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे. (source – toyota)
-
कंपनीने आता टोयोटा हायक्रॉस सादर केली असून त्यात अनेक आकर्षक फीचर्स देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, हायक्रॉसला सनरूफ देण्यात आला आहे जे इनोव्हा वाहनाला पहिल्यांदाच मिळाले आहे. (source – toyota)
-
हायक्रॉस ही सेल्फ चार्जिंग हायब्रीड इलेक्ट्रिक कार आहे. विशेष म्हणजे, सुरू केल्यानंतर पहिल्या अवघ्या 9.5 सेकंदांमध्ये ही कार ताशी १०० किलोमीटर्सचा वेग गाठू शकते. (source – toyota)
-
ही कार २०२३ या नवीन वर्षांत, जानेवारी महिन्यापासून उपलब्ध होणार असून तिच्या बुकिंगला सुरुवात झाली आहे. (source – toyota)
-
हायब्रीड म्हणजेच पेट्रोल आणि वीजेवर चालणारे इंजिन हे या मॉडेलचे खास वैशिष्ट्य आहे. प्रति लिटर २१.१ मायलेजचा दावा कंपनीने केला आहे. (source – toyota)
-
बाहेरून या कारचा लूक एसयूव्ही (SUV) सारखा राहील, याची काळजी कंपनीने घेतली आहे. (source – toyota)
-
हायक्रॉसची लांबी ४,७५५ मिमी. असून रुंदी १,८५० मिमी. आहे. इनोव्हा क्रिस्टापेक्षा लांबी – रुंदी अधिक आहे. व्हीलबेसही १०० मिमीने अधिक आहे. या कारचे इंटिरिअर क्रिस्टापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. (source – toyota)
-
आतमध्ये जेबीएलचे नऊ स्पिकर्स असलेली साऊंड सिस्टिम देण्यात आली आहे. (source – toyota)
-
टोयोटाने या निमित्ताने प्रथमच भारतात एडीएएस ही सुरक्षा प्रणाली हायक्रॉसमध्ये वापरली आहे. यामध्ये लेन कीप असिस्ट, रेअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट, प्री- कोलिजन सिस्टिम आणि ब्लाइंड स्पॉट मॉनिटर यांचा समावेश करण्यात आला आहे. (source – toyota)
-
याशिवाय सुरक्षेसाठी सहा एअर बॅग्जही देण्यात आल्या आहेत. आठ जण सहज बसून प्रवास करू शकतील, अशी अंतर्गत रचना करण्यात आली आहे. (source – toyota)
-
सध्या केवळ ५० हजार रूपये भरून गाडीचे बुकिंग करता येईल. जानेवारी, २०२३ मध्येच कंपनी गाडीची किंमत जाहीर करणार आहे, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले. (source – toyota)

“ती गरोदर आहे आणि…”, बापाने स्वत:च्याच मुलीशी केलं लग्न, धक्कादायक VIDEO होतोय व्हायरल