-
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आज महाराष्ट्रातील नागपूरमध्ये वेगवेगळ्या प्रकल्पांच्या लोकार्पण सोहळण्यासाठी, पायाभरणीच्या कार्यक्रमांना हजेरी लावली. आजच्या एका दिवसाच्या दौऱ्यामध्ये मोदींनी ७५ हजार कोटींच्या प्रकल्पांच्या उद्घाटन तसेच पायाभरणी कार्यक्रमांना हजेरी लावली. (सर्व फोटो ट्वीटरवरुन साभार)
-
सकाळी साडेनऊच्या सुमारास पंतप्रधान मोदी नागपूर विमानतळावर दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी राज्यपाल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीही उपस्थित होते.
-
राज्यपाल भगसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींबरोबर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेही विमानतळावर हजर होते.
-
सकाळी साडेनऊ वाजता पंतप्रधानांचे नागपूर विमानतळावर आगमन झाले. तेथून ते थेट रल्वे स्थानकावर गेले.
-
मोदींनी नागपूर- बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. मध्य भारतातील ही पहिली वंदे भारत एक्सप्रेस आहे.
-
यावेळेस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी खास चित्र पंतप्रधान मोदींना भेट म्हणून दिलं.
-
मोदींनी या ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांबरोबर ट्रेनमध्ये जाऊन चर्चा केली. या एक्सप्रेस गाडीच्या माध्यमातून महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आणि छत्तीसगडची राजधानी रायपूर आणि बिलासपूर ही महत्वाची शहरं जोडली जाणार आहेत.
-
मोदींनी या रेल्वेच्या मोटरमन्सकडूनही रेल्वेसंदर्भातील माहिती घेतली. प्रवासी घेणार वेगवान व सुरक्षित प्रवासाचा अनुभव. विमान प्रवासाची प्रचिती घेतानाच ‘कवच’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून या एक्सप्रेस गाडीत सर्वोत्तम सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.
-
या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर खापरी येथे मेट्रो मार्गिकेच्या उद्गाटनाचा कार्यक्रम आटोपून पंतप्रधान ‘समृद्धी’च्या वायफळ टोल नाक्याजवळ असलेल्या कार्यक्रम स्थळी आले.
-
मोदींच्या हस्ते नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या शिर्डीपर्यंतच्या ५२० किलोमीटर टप्प्याचे लोकार्पण करण्यात आलं.
-
तेथे मोदींच्या स्वागतासाठी ढोलपथक तैनात होतं. या ढोल पथकामधील तरुणांचा उत्साह आणि वादन पाहून मोदींनीही ढोलवादन केलं. या ढोल-ताशा पथकातील एका तरुणाजवळ जात मोदींनी स्वत: ढोलवादन केलं.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मोदींनी या महामार्गाची पहाणी केली.
-
याच महामार्गावरुन पंतप्रधान मोदींच्या ताफ्याने एक फेरफटकाही मारला.
-
समृद्धी एक्सप्रेस हायवेच्या लोकार्पण सोहळ्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते एम्स नागपूरचे राष्ट्रार्पणही करण्यात आलं.
-
मोदींनी एम्स प्रकल्प नेमका कसा आहे, त्याचा कोणाला आणि किती फायदा होणार यासारखी माहिती अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.
-
एम्स नागपूरमुळे शहर आणि परिसरातील , विशेषतः दुर्गम आदिवासी भागातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधा मजबूत होतील. आज एम्सचे उदघाटन करतांना मला विशेष आनंद होत आहे, या मराठी कॅप्शनसहीत मोदींनी या उद्घाटन सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”