-
दिल्लीत कंझावला भागात अपघाताची भीषण घटना १ जानेवारीला उघडकीस आली. (सर्व फोटो सौजन्य-ट्विटर))
-
या अपघातात ज्या मुलीचा मृत्यू झाला ती मुलगी ३१ डिसेंबरच्या रात्री घरातून बाहेर पडली होती. मी घरी १० वाजेपर्यंत येते असं तिने सांगितलं होतं. प्रत्यक्षात तिचा मृतदेह पोलिसांना दुसऱ्या दिवशी पहाटे आढळला
-
हा अपघात नुसता अपघात नव्हता तर ज्या कारने या मुलीला धडक दिली त्या कारने तिला सुमारे १२ किमी फरफटवत नेलं
-
या भीषण अपघाताचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे, त्यावरून हा अपघात किती भयंकर होता ते कळतं आहे
-
हा अपघात झाल्यानंतर ज्यांनी या मुलीला धडक दिली ते सगळे जण फरार झाले होते मात्र कारच्या नंबरवरून पोलिसांनी या सगळ्यांचा छडा लावला
-
अपघाताची बातमी रविवारी समोर आली आणि पोलिसांनी सोमवारी या प्रकरणातल्या पाचही आरोपींना अटक केली. तसंच पाचही आरोपींना अटक केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन दिली
-
या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचाही प्रयत्न झाला. ज्यांनी मुलीला धडक दिली त्यातला एक भाजपाचा कार्यकर्ता आहे हे सांगत आपने सरकारविरोधात आंदोलन केलं
-
हा अपघात झाल्यानंतर या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं तसंच या मुलीचा मृतदेह पोलिसांना छिन्नविछिन्न अवस्थेत आणि नग्न अवस्थेत आढळून आला
-
नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार या मुलीसोबत आणखी एक मुलगी होती असंही समजतं आहे
-
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. तसंच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत
-
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही दिल्ली अपघाताचं गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणात पोलिसांना तातडीने अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत
-
हा अपघात सध्या सोशल मीडियावरही चर्चेत आहे. आपली मुलगी घरी येणार नाही हे जेव्हा या मुलीचा आईला समजलं तेव्हा तिने आर्त हंबरडा फोडला
-
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीच्या उत्तानपणावर टीका केली होती. त्यानंतर उर्फीने दिल्लीतल्या अपघाताचा व्हिडिओ पोस्ट करत चित्रा वाघ यांना प्रश्न विचारले आहेत
-
या मुलीच्या अपघाताची चर्चा अजूनही सुरू आहे, पोलीस आरोपींची चौकशी करत आहेत त्यांच्याकडून या अपघाताचं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत
-
मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टेम झाल्यानंतर बाहेर आणतानाचा फोटो, आज अपघाती मृत्यू झालेल्या या मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई