-
एखाद्या अती थंड प्रदेशात ज्याप्रमाणे नदीवर बर्फाची चादर असते तशीच अवस्था सध्या इंद्रायणी नदीची झालेली आहे.
-
देवाच्या आळंदीत इंद्रायणी नदी प्रदूषित का झाली आहे? असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.
-
इंद्रायणी नदी पात्रात लाखो वारकरी मोठ्या श्रद्धेने स्नान करून माऊलींचे दर्शन घेतात. परंतु नदीची सध्या दिसत असलेली अवस्था बघता लाखो वारकऱ्यांचे आणि आळंदीतील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
-
आधीच जलपर्णीने इंद्रायणीचा श्वास गुदमरत आहे,आता त्यात जलप्रदूषणाची भर पडली असून अवघ्या नदी पात्रात फेसच-फेस दिसत आहे.रसायनयुक्त पाणी सोडल्याने नदीची अशी अवस्था झाल्याचे बोलले जात आहे.
-
आळंदीत काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वारकऱ्यांच्या कार्यक्रमाला आले असताना महेश महाराज मडके या युवकाने इंद्रायणी नदी प्रदूषणाचा मुद्दा मांडला होता.
-
सोशल मीडियावर इंद्रायणी नदीचा फेसाळलेला व्हिडिओ व्हायरल होताच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने नदीच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.
-
रामदरी, मोई, मोशी, चिंबळी, डुडूळगाव आणि आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेऊन गेले आहेत.
-
ड्रेनेज,सांडपाणी नदीत प्रक्रिया न करता थेट सोडल्याने फेस होऊ शकतो, सांडपाण्यात डिटेरजेन्ट असते यामुळं बंधाऱ्यावरून खाली पाणी पडताच तिथं फेस येतो असा तर्क अधिकाऱ्यांकडून लावला जात आहे.
-
इंद्रायणी प्रदूषणावर तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आळंदीत वारकऱ्यांनी दिला आहे.
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल