-
राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी आज तिथल्या विधानसभेत केलेली एक चूक सध्या देशाच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
-
राजस्थानच्या विधिमंडळात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असून आज मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अर्थसंकल्प मांडला. पण अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी गेहलोत यांनी केलेली एक चूक प्रमुख विरोधी पक्ष भाजपाच्या हाती आयतं कोलीत ठरली.
-
मुख्यमंत्री अर्थसंकल्प सादर करण्यासाठी पहिले ८ ते १० मिनीट मुख्यमंत्री चक्क गेल्या वर्षीचं भाषण वाचत राहिले!
-
काही वेळानंतर त्यांच्या मागे बसलेले पक्षाचे मुख्य प्रतोद महेश जोशी यांनी ही चूक लक्षात आणून दिल्यानंतर हा सगळा प्रकार थांबला आणि मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली. मात्र, तोपर्यंत विरोधकांनी गदारोळ सुरू केला होता.
-
नेमकं झालं असं की मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अधिवेशन कामकाजात ठरल्याप्रमाणे अर्थसंकल्प वाचायला सुरुवात केली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या मागे त्यांचे एक मंत्री आणि पक्षाचे व्हीप महेश जोशी बसले होते.
-
मुख्यमंत्री अशोक गेहलोत भाषण वाचत असताना सत्ताधारी पक्षावरचे काँग्रेस आमदार टाळ्या वाजवून, बाकं वाजवून मुख्यमंत्री वाचत असलेल्या तरतुदींना दाद देत होते.
-
मुख्य प्रतोद महेश जोशी हेही टेबल वाजवून दाद देत होते. पण त्याचवेळी त्यांच्या चेहऱ्यावर मात्र काहीतरी चुकल्यासारखे हावभाव दिसत होते.
-
महेश जोशी आसपासच्या सदस्यांशी बोलून नेमकं काय चुकलंय याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होते. इकडे मुख्यमंत्र्यांचं मात्र अर्थसंकल्पीय वाचन चालूच होतं.
-
इकडे मुख्यमंत्र्यांचं वाचन चालूच होतं. मागे महेश जोशींनी अखेर कानावरचे हेडफोन काढले आणि ते बाजूच्या बाकावर जाऊन तिथे बसलेल्या सदस्यांशी बोलू लागले.
-
शेवटी इतर सदस्यांशी चर्चा केल्यानंतर महेश जोशींची खात्री पटली की मुख्यमंत्री अशोक गेहलोत चक्क गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प वाचत आहेत. त्यांनी लगेच मुख्यमंत्र्यांच्या कानात काहीतरी सांगितलं.
-
सुमारे तीन मिनिटांपर्यंत भाषणाचं वाचन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या मागे बसलेल्या महेश जोशींची चलबिचल वाढली. त्यांना बाजूच्या बाकांवर बसलेल्या काही सदस्यांनी खाणाखुणा करायला सुरुवात केली.
-
महेश जोशींनी नेमकं काय सांगितलं, हे जरी मुख्यमंत्र्यांना समजलं नसलं, तरी त्यांना एवढं मात्र समजलं की काहीतरी चुकलंय. त्यांनी एकदा विरोधी बाकांकडे बघितलं. तिथून काही सदस्य हसत असल्याचं आणि कुजबुजत असल्याचं त्यांना जाणवलं.
-
मग त्यांनी सत्ताधारी बाकांवर मागे वळून पाहिलं. तिथे काही सदस्यांनी त्यांना गेल्या वर्षीचं अर्थसंकल्पीय भाषण वाचत असल्याचं सांगितलं.
-
तेव्हा कुठे अशोक गेहलोत यांना लक्षात आलं की ते गेल्या ८ ते १० मिनिटांपासून गेल्या वर्षीचं अर्थसंकल्पीय भाषण वाचत होते. त्यांनी लागली. ‘एक मिनीट.. सॉरी’, असं म्हणून दिलगिरी व्यक्त केली आणि हातातलं भाषण मिटून ठेवलं.
-
मुख्यमंत्री अशोक गेहलोत भाषणाची प्रत तपासून पाहात असतानाच समोरच्या बाकांवरून विरोधी पक्षानं आरडा-ओरडा करायला सुरुवात केली. “आता हाही इतिहास घडणं शिल्लक होतं, शेम..शेम..शेम”, अशी टोलेबाजी विरोधकांनी सुरू केली.
-
विरोधकांच्या गदारोळानंतर विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी चांगलेच संतप्त झाले. “तुम्हाला अर्थसंकल्पाचा मान ठेवायचा आहे की नाही?” असा सवाल त्यांनी विरोधकांना केला.
-
आठ मिनिटंपर्यंत मुख्यमंत्री जुना अर्थसंकल्प वाचत राहिले. मला वाटतं इतिहासात पहिल्यांदा असं काही घडलंय. आम्हीही मुख्यमंत्रीपदी राहिलो आहोत. मी तीन-चार वेळा अर्थसंकल्प हाती घेऊन तपासत होते, असं वसुंधरा राजे म्हणाल्या.
-
जो मुखयमंत्री एवढी महत्वाची प्रत न तपासता जुना अर्थसंकल्प वाचू शकत असेल, तर अशा व्यक्तीच्या हाती राज्य किती सुरक्षित असेल? असा सवाल विरोधी पक्षनेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी उपस्थित केला.
-
दरम्यान, हा गदारोळ झाल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपली चूक मान्य केली. मात्र, त्याचवेळी त्यांच्या हाती अर्थसंकल्पाची प्रत सोपवणाऱ्या अधिकाऱ्यांची चूक असल्याचंही नमूद केलं.
-
या अर्थसंकल्पाची पहिली दोन पानं मी वाचली. तिसरं पान वाचताना मला वाटत होतं की या घोषणा आधीही झाल्या आहेत. अर्थसंकल्प बनवणाऱ्या अधिकाऱ्यांनी काळजी घ्यायला हवी होती. पण ठीक आहे, काय अडचण आहे? असं अशोक गेहलोत म्हणाले.
-
यानंतर मात्र राजस्थानच्या विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे हे झालं होतं. त्याचवेळी मी दिलगिरीही व्यक्त केली. हे काही पहिल्यांदा झालं नाहीये. वसुंधरा राजे मुख्यमंत्री असतानाही त्यांनी काही आकडे दुरुस्त केले होते, असं अशोक गेहलोत म्हणाले.
-
मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरावर वसुंधरा राजे भडकल्या. “तुम्ही जे काही केलंय, तो निव्वळ बेजबाबदारपणा आहे. कुणीही मुख्यमंत्री अशा प्रकारे आपला अर्थसंकल्प न वाचता घेऊन येत नाही. असं होत असेल, तर मला वाटतं राजस्थानचं काय होईल?” असा खरमरीच सवाल वसुंधरा राजेंनी उपस्थित केला.
-
यानंतर राजस्थानच्या इतिहासात पहिल्यांदा अर्थसंकल्पीय भाषणाच्या दिवशी सदनाचं कामकाज स्थगित करावं लागलं.

१ एप्रिल राशिभविष्य: अंगारकी विनायक चतुर्थीला बाप्पा कोणत्या राशीच्या पाठीशी उभा राहणार? कोणाला फायदा तर कोणाची इच्छापूर्ती होणार