-
सध्याच्या काळातील देशातील सर्वात अत्याधुनिक, वेगवान, मध्यमवर्गाच्या खिशाला परवडेल अशी ट्रेन म्हणून वंदे भारत एक्सप्रेस ओळखली जाते
-
२०१५च्या सुमारास भारतात सेमी-हाय-स्पीड ट्रेन असावी अशी संकल्पना पुढे आली आणि त्यानुसार चैन्नई इथल्या Integral Coach Factory ने ट्रेन प्रत्यक्षात आणली
-
२०१८ ला ट्रेनची निर्मिती पूर्ण झाली म्हणून सुरुवातीला Train-18 असं संबोधण्यात आलं. २०१९ मध्ये ट्रेनच्या चाचण्या पूर्ण
-
जास्तीत जास्त १८० किलोमीटर प्रति तास वेगाने धावण्याची क्षमता पण सुरक्षेच्या दृष्टीकोनातून १३० पर्यंतचा वेग मर्यादीत ठेवण्याचे निश्चित
-
जर्मनीच्या LHB कंपनीनेने दिलेल्या तंत्रज्ञानावर आधारीत ट्रेनची निर्मिती, मजबूत आणि हलके डबे यांमुळे ट्रेनचा प्रवास वेगवान आणि सुरक्षित
-
१५ फेब्रुवारीला २०१९ ला पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थित Train-18 मधून प्रवासी वाहतुकीला सुरुवात, त्यावेळी Train-18 चे नाव बदल ‘वंदे भारत एक्पप्रेस’ असं करण्यात आले
-
वंदे भारत एक्सप्रेसच्या सुरुवातीला नवी दिल्ली -वाराणासी मार्गावर मर्यादीत फेऱ्या सुरु
-
संपुर्णपणे वातनुकुलित chair car मधून धक्के विरहित प्रवास अशी या ट्रेनची अल्पवधीतच वेगळी ओळख निर्माण झाली
-
फक्त बाहेरील आकारच नाही तर अत्यंत आकर्षक अंतर्गत रचना यामुळेही वंदे भारत एक्सप्रेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे
-
सध्या देशात १० मार्गावर तर राज्यात चार मार्गावरुन धावत आहे वंदे भारत एक्सप्रेस
-
पुढील तीन वर्षात ४०० वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्याचे नियोजन, देशातील सर्व प्रमुख शहरांदरम्यान ही एक्सप्रेस धावणार
-
समाजकंटकांकडून होणारी दगडफेक, मार्गावर आलेल्या गुरांमुळे झालेले नुकसान यामुळेही वंदे भारत एक्स्पेस चर्चेत राहीली आहे ( फोटो सौजन्य – भारतीय रेल्वे आणि सोशल मीडिया )

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”