-
रवींद्र धंगेकर विजयी झाल्यानंत त्यांची अशी विजयी मिरवणूक काढण्यात आली होती
-
भाजपाच्या हेमंत रासने यांचा पराभव केल्यानंतर कसबा मतदार संघात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून अत्यंत थाटामाटात रवींद्र धंगेकरांचं स्वागत केलं
-
रवींद्र धंगेकर हे सुरूवातीला मनसेत होते, त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसने त्यांना आमदारकीचं तिकिट कसबा पोटनिवडणुकीत दिलं त्याच संधीचं सोनं रवींद्र धंगेकर यांनी करून दाखवलं
-
गुलाल, हार, फटाके महाविकास आघाडीचा विजय असो रवी धंगेकर आगे बढो हम तुम्हारे साथ है या घोषणांनी कसबा दुमदुमला होता.
-
रवींद्र धंगेकर यांनी अशा प्रकारे सगळ्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांना अभिवादन केलं
-
रवींद्र धंगेकर यांनी भाजपाच्या हेमंत रासनेंना धोबीपछाड दिल्याने भाजपाच्या २८ वर्षाचा बालेकिल्ला भाजपाकडून हिरावून घेतला आहे
-
रवींद्र धंगेकर यांच्या या कामगिरीचं अजित पवारांनी तोंडभरून कौतुक केलं आहे
-
रवींद्र धंगेकर यांच्यासोबत कार्यकर्त्यांनीही जल्लोष केला. रवींद्र धंगेकर यांनीही पत्रकार परिषद घेत भाजपाच्या पराभवाची ही सुरूवात झाली आहे असं म्हटलं आहे

