-
स्वराज्याची स्थापना करण्याचं ध्येय घेऊन वयाच्या १६व्या वर्षी शपथ घेणाऱ्या शिवरायांचे बरोबर ३५० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी ‘छत्रपती’ शिवाजी महाराज झाले! रायगडावर मोठ्या दिमाखात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. त्या घटनेला तिथीनुसार आज ३५० वर्षं पूर्ण झाली. यानिमित्ताने रायगडावर मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा झाला. (फोटो – हर्षद कशाळकर)
-
रायगडावर शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यासाठी अवघ्या रायगडावर फुलांची आरास करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला यावेळी फुलांनी सजवण्यात आलं. महाराजांचा बसलेल्या स्थितीतील चांदीचा पुतळा पालखीसाठी सजवण्यात आला होता, या पालखी सोहळ्यासाठी अनेक नेतेमंडळी आणि मान्यवर उपस्थित होते. (फोटो – एकनाथ शिंदे ट्विटर)
-
राज्यात युतीचे सरकार स्थापन केल्यापासून कायम सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवूनच आपण काम करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा थोर वारसा जतन करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर असून त्यांचे गडकोट किल्ले वाचवण्यासाठी दुर्ग प्राधिकरण करण्याबाबत शासन विचार करत आहोत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. (फोटो – एकनाथ शिंदे ट्विटर)
-
रायगड संवर्धनासाठी जसे रायगड प्राधिकरण केले त्याचप्रमाणे प्रतापगड संवर्धनासाठी प्रतापगड प्राधिकरणाची स्थापना करण्यात येत असल्याचे याप्रसंगी जाहीर केले, तसेच त्याच्या अध्यक्षपदी खासदार उदयनराजे भोसले यांची निवड करत असल्याचेही यावेळी बोलताना शिंदे यांनी जाहीर केले. रायगडाच्या पायथ्याला शिवसृष्टी उभारण्यासाठी ४५ एकर जागा राखीव असून त्याठिकाणी अत्यंत सुंदर अशी शिवसृष्टी उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात ५० कोटी रुपयांचा निधी देत असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. (फोटो – एकनाथ शिंदे ट्विटर)
-
औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव, अहमदनगरचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर असे नामांतर करण्याचा निर्णय घेतला असून मुंबईतील कोस्टल रोडला देखील छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात येणार असल्याच्या घोषणांचा यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला. शेतकऱ्यांना १ रुपयात पीक विमा, नमो शेतकरी सन्मान योजना, जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेऊन राज्यातील बळीराजाला आधार दिला असून या निर्णयामागेही शिवछत्रपतींची प्रेरणा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. (फोटो – एकनाथ शिंदे ट्विटर)
-
मोठ्या संख्येने जमलेल्या शिवभक्तांना संबोधित करताना ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी मिळणे हा माझा बहुमान असल्याचे सांगत, या सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे मुख्यमंत्री शिंदे यांनी आभार मानले. महाराजांनी आपल्याला सुराज्य कसे असावे त्याची शिकवण दिली आणि आज त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन नीतीने राज्यकारभार सुरू असल्याचे यावेळी सांगितले. त्यांचे राज्य हे लोककल्याणकारी राज्य होते, तसेच सुराज्य निर्माण करण्याची संधी आम्हाला मिळाली असल्याचे यासमयी बोलताना नमूद केले. आजचा सोहळा म्हणजे रयतेच्या राजाच्या कर्तृत्वाची पूजा करण्याचा भाग्यक्षण असल्याचेही शिंदेंनी नमूद केले. (फोटो – एकनाथ शिंदे ट्विटर)
-
किल्ले रायगडावरील हा शिवराज्याभिषेक सोहळा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावलौकिकाला साजेसा असाच ठरला. यावेळी पारंपरिक पद्धतीने दुग्धाभिषेक आणि जलाभिषेक करून शिवरायांना अनेक शस्त्रास्त्रे विधिवत् प्रदान करण्यात आली. त्यानंतर लाखो शिवप्रेमींच्या साथीने शिवछत्रपतींची भक्तिभावाने आरती करून त्यांना मानाचा मुजरा करण्यात आला. पालखीत बसवून शिवछत्रपतींची जगदीश्वराच्या मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. (फोटो – एकनाथ शिंदे ट्विटर)
-
हा भव्यदिव्य कार्यक्रम याची देही याची डोळा पाहण्यासाठी शिवभक्तांची गर्दी लोटली होती. (फोटो – एकनाथ शिंदे ट्विटर)
-
(फोटो – हर्षद कशाळकर)
-
बाल शिवभक्तही यावेळी उपस्थित होते. (फोटो – हर्षद कशाळकर)
-
हा भव्यदिव्य कार्यक्रम याची देही याची डोळा पाहण्यासाठी शिवभक्तांची गर्दी लोटली होती. (फोटो – हर्षद कशाळकर)
-
(फोटो – हर्षद कशाळकर)
-
शिवभक्तांच्या स्वागतासाठीही पायघड्या अंथरण्यात आल्या होत्या. (फोटो – हर्षद कशाळकर)
-
ढोल ताशांच्या गरजात किल्ले रायगड परिसर दुमदुमून गेला होता. (फोटो – हर्षद कशाळकर)
-
(फोटो – हर्षद कशाळकर)
-
(फोटो – हर्षद कशाळकर)
-
(फोटो – हर्षद कशाळकर)
-
(फोटो – हर्षद कशाळकर)
-
(फोटो – हर्षद कशाळकर)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य