-
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात एक्य दर्शवण्याकरता गेल्या काही दिवसांपासून विरोधक एकत्र येण्याचा प्रयत्न करत होते. त्यासाठी आपचे केजरीवालांसह बिहारच्या नितीश कुमारांपर्यंत सर्वचजण देशभरातील विरोधकांची त्यांच्या राज्यात जाऊन भेटी घेत होते. त्यापार्श्वभूमीवर विरोधकांची एकजूट दाखवण्याकरता कुठेतरी संयुक्त बैठक घेऊन रणनीती ठरवणं गरजेचं असल्याने नितीश कुमारांच्या नेतृत्त्वाखाली आज बिहारमध्ये सर्व विरोधी पक्ष एकवटले होते. (फोटो – एएनआय)
-
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती, काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार संजय राऊत, युवानेते आदित्य ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आदी नेतेमंडळी या बैठकीला उपस्थित होते. (फोटो – एएनआय)
-
“ही अत्यंत चांगली बैठक झाली. सर्वांनी एकत्र चालण्याची सहमती दर्शवली आहे. येत्या काळात सर्व पक्षीयांची आणखी एक बैठक होणार आहे. पुढच्या बैठकीत रणनीती ठरवण्यात येणार आहे. एकत्र निवडणूक लढवण्याची सहमती आजच्या बैठकीत झाली आहे”, असं नितीश कुमार यांनी बैठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. (फोटो – एएनआय)
-
“पुढच्या बैठकीत अंतिम रुप घेतलं जाईल. कोण कुठून लढवणार हे या बैठकीत ठरवलं जाईल. सध्या जे शासनमध्ये आहेत ते देशहिताचं काम करत नाहीयत. ते देशाचा इतिहास बदलायला निघाले आहेत. स्वातंत्र्यांच्या लढाईलाही ते विसरतील. यामुळे चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे विरोधक एकजूट राहणार आहेत. राज्यातील सरकारवरून आव्हाने निर्माण झाली तर सर्व एकत्र राहणार आहेत”, असंही नितीश कुमार म्हणाले. (फोटो – एएनआय)
-
“पुढच्या बैठकीत अंतिम रुप घेतलं जाईल. कोण कुठून लढवणार हे या बैठकीत ठरवलं जाईल. सध्या जे शासनमध्ये आहेत ते देशहिताचं काम करत नाहीयत. ते देशाचा इतिहास बदलायला निघाले आहेत. स्वातंत्र्यांच्या लढाईलाही ते विसरतील. यामुळे चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे विरोधक एकजूट राहणार आहेत. राज्यातील सरकारवरून आव्हाने निर्माण झाली तर सर्व एकत्र राहणार आहेत”, असंही नितीश कुमार म्हणाले. (फोटो – एएनआय)
-
कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत सर्व नेते आले आहेत. सर्व नेत्यांनी एक होऊन पुढे निवडणूक लढण्यासाठी एक कॉमन अजेंडा तयार करत आहोत. १० किंवा १२ जुलै रोजी शिमल्यामध्ये पुढची बैठक होणार आहे. या बैठकीत अजेडा तयार केला जाईल. कोणत्या मुद्द्यांवर निर्णय घेतला जाईल, पुढे कसं चाललं पाहिजे. प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने काम करावं लागणार आहे. कारण एकाच मुद्द्यावर प्रत्येक राज्यात चालून नाही चालणार, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली. (फोटो – काँग्रेस ट्विटर)
-
“देशातील सर्व पक्षातील प्रमुख नेते येथे आले आहेत. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सर्व नेते येथे आले आहेत. वेगवेगळ्या पक्षाचे नेते असल्याने आमच्यात मतभेद असतील, पण देश एक आहे. देशाला वाचवण्यासाठी, देशाची एकता आणि अखंडता कामय राखण्यासाठी एकत्र आलो आहोत, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली. (फोटो – एएनआय)
-
देशातील स्वातंत्र्यावर आघात केला जाईल तेव्हा आम्ही विरोध करणार आहोत. विरोधकांची एकता होईल की नाही अशी शंका निर्माण केली जाते. पण मी स्वतःला विरोधक मानतच नाही. पण जे देशद्रोही आहेत, जे देशात हुकुमशाही आणू इच्छितात त्याविरोधात आम्ही उभे राहणार आहोत. सुरुवात चांगली झाली की पुढेही सर्व चांगलं होतं, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. (फोटो – उद्धव ठाकरे ट्विटर)
-
(फोटो – उद्धव ठाकरे ट्विटर)
-
(फोटो – उद्धव ठाकरे ट्विटर)
-
आज आपण देशात रोज एक नवीन समस्या पाहत आहोत. ठिकठिकाणी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजाच्या ऐक्यासाठी आज आपल्याला भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या साथीदारांचा सामना करावा लागणार आहे. आपण एकत्रितपणे त्याचा सामना केला पाहिजे. काही मतभेद असतील किंवा इतर असतील, पण राष्ट्रहितासाठी आम्ही परस्पर समस्यांकडे दुर्लक्ष करून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. मला विश्वास आहे की पाटण्यापासून ही सुरुवात देशात बदल घडवून आणण्यासाठी सुरू झाली आहे, असं शरद पवार म्हणाले. (फोटो – एएनआय)
-
जयप्रकाशजींच्या नेतृत्वाखाली येथून एक संदेश दिल्याचे मला आठवते. त्यामुळे संपूर्ण देशात वेगळेच वातावरण निर्माण झाले होते. येथून अनेक चळवळी सुरू झाल्या आणि देशाच्या इतिहासात त्याचा स्वीकार झाला. आजच्या परिस्थितीत नितीशजींनी ही बैठक बोलावली आणि सगळे मित्र इथे आले. बैठकीत झालेल्या चर्चेत एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातून आमची नवी वाट दाखवण्याचे काम सुरू झाले आहे. मला पूर्ण विश्वास आहे की देशातील जनता त्याला साथ देईल, असंही पवार म्हणाले. (फोटो – शरद पवार ट्वीटर)
-
या बैठकीत विविध राज्यातील मुख्यमंत्री आले आहेत. चांगल्या प्रकारे बैठक पार पडली. अनेक वरिष्ठ नेते या बैठकीला होते. पाटणातून जे सुरू होतं, त्याला जनआंदोलनाचं रुप येतं. खूप सारे आंदोलन पाटणातून सुरू झाले. आम्ही एकत्रित आलो आहेत. आम्ही एक आहोत. आम्ही एकत्र लढू. आम्ही विरोधक नाहीत. या देशाचे नागरिक आहोत. आम्हीही देशप्रेमी आहोत. मणिपूर जळल्याने आमचीही मनं जळतात. भाजपाचे हुकुमशाही सरकार सुरू आहे. जे विरोधात बोलतात त्यांच्याविरोधात ईडी सीबीआय लावले जातात. माध्यमांना बांधून ठेवलं आहे. पण बेरोजगारीच्या बाबतीत कोणी बोलतन नाही, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. इथून इतिहास सुरू झाला आहे. भाजपाला इतिहास बदलायचा आहे. पण आम्हाला इतिहास सारखाच ठेवायचा आहे, असा एल्गारही त्यांनी पुकारला. (फोटो – एएनआय)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”