-
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवून भाजपाने सत्ता स्थापन केली. काँग्रेसला धोबीपछाड करत नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर विराजमान झाले. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकतही भाजपाचाच विजय झाला. आता २०२४ मध्ये भाजपाला हरवण्यासाठी विरोधकांनी ऐकी केली आहे. (फोटो – मल्लिकार्जुन खरगे/ट्विटर)
-
सत्तेत आल्यापासून भाजपाने सातत्याने सरकारी यंत्रणांचा गैरफायदा घेत विरोधकांवर कारवाई करण्यात येत असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येतोय. तसंच, प्रादेशिक पक्ष फोडण्याचंही राजकारण भाजपाकडून केलं जात असल्याचा आरोप केला जातोय. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला नमवण्यासाठी देशातील सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे देशातील २६ पक्ष एकत्र आले आहेत. (फोटो – मल्लिकार्जुन खरगे/ट्विटर)
-
२६ पक्षांच्या संयुक्त दोन बैठका आतापर्यंत पार पडल्या आहेत. जून महिन्यात पहिली बैठक पाटण येथे पार पडली. तर, दुसरी बैठक आज (१८ जुलै) बंगळुरू येथे झाली. तर, पुढची बैठक आता मुंबईत होणार असल्याचं मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहीर केलं. (फोटो – मल्लिकार्जुन खरगे/ट्विटर)
-
या बैठकीत सर्वांत महत्त्वाचा निर्णय झाला तो आघाडीच्या नावाचा. या आघाडीला आता नाव देण्यात आलं आहे. INDIA असं या आघाडीचं नाव असून Indian National Developmental Inclusive Alliance असा त्याचा पूर्ण अर्थ होतो. (फोटो – आदित्य ठाकरे/ट्विटर)
-
या बैठकीला काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सिपीआय नेते सीताराम येचुरी, समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे नेते खा. डेरेक ओ ब्रायन, ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांसह अनेकजण उपस्थित होते. (फोटो – काँग्रेस/ट्विटर)
-
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, “दुसरी बैठक यशस्वी झाली आहे. हुकूमशाहीविरोधात जनता एकत्र येत आहे. ‘इंडिया’साठी आपण एकत्र आलो आहोत. अनेकांनी मला विचारलं की, वेगवेगळ्या विचारधारेचे लोक आहेत. राजकारणात विचारधारा वेगळी पाहिजेलच. यालाच लोकतंत्र म्हणतात. पण, ही लढाई आपल्या पक्षांसाठी नाही. काहींना असं वाटत आहे, की कुटुंबासाठी लढाई लढत आहे. पण, हा देश आमचं कुटुंब आहे. आम्ही या कुटुंबासाठी लढत आहोत. कारण, या कुटुंबाला आपल्याला वाचवायचं आहे.” (फोटो – आदित्य ठाकरे/ट्विटर)
-
“आता काय होणार? अशी भीती देशातील लोकांमध्ये आहे. त्यांना सांगू इच्छितो की, घाबरू नका, आम्ही आहोत. जसा ‘मैं हूं ना’ चित्रपट आला होता. तसे ‘हम हैं ना’. चिंता करण्याची गरज नाही. एक व्यक्ती आणि एक पक्ष देश होऊ शकत नाही. जनता म्हणजे देश आहे. देशातील जनता ‘इंडिया’ बनून समोर येईल. आपल्या देशाला आपण सुरक्षित ठेवू. पुढील बैठक मुंबईत होणार आहे,” अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. (फोटो – शिवसेना /ट्विटर)
-
या बैठकीला ममता बॅनर्जीही उपस्थित होत्या. त्यांनीही सत्ताधाऱ्यांविरोधात हल्लाबोल केला. (फोटो – TMC/ट्विटर)
-
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “आजची बैठक चांगली झाली. आजपासून खरं आव्हान सुरू झालं आहे. आमच्या २६ पक्षांच्या बैठकीत आघाडीला INDIA नाव देण्याचं ठरलं आहे. तुम्ही आधी युपीए नाव ऐकलं. एनडीए आताही आहे. पण प्रत्यक्षात हे अस्तित्वात नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात अनेकांचं जीवन धोक्यात आहे. अल्पसंख्याक, बहुसंख्याक, मुस्लिम, शीख, ईसाई, दिल्ली, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, बंगाल, महाराष्ट्र सर्वच धोक्यात आहेत. सरकार विकणं आणि सरकार खरेदी करणं हेच सरकारचं काम आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी खरं आव्हान स्वीकारलं आहे”, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. (फोटो – TMC/ट्विटर)
-
“NDA CAN U CHALLENGE INDIA (एनडी इंडियाला आव्हान देऊ शकतं का?), BJP CAN YOU CHALLENGE INDIA (भाजपा इंडियाला चॅलेंज देऊ शकतं का?), CAN ANYBODY CHALLENGE INDIA (कोणी इंडियाला चॅलेंज करणार का?) आम्ही आमच्या देशावर प्रम करतो. देशप्रेमींवर आम्ही प्रेम करतो. आम्ही विद्यार्थी, शेतकरी, दलित, अर्थव्यवस्थेसाठी काम करतो. आम्ही देशासाठी आणि जगासाठी आहोत. यापुढे सर्व कार्यक्रम, जाहिरात इंडिया या बॅनर अंतर्गत होणार. जर तुम्हाला आव्हान द्यायचंय तर द्या”, असा एल्गारही ममता बॅनर्जी यांनी पुकारला. (फोटो – TMC/ट्विटर)
-
विरोधकांची आघाडी तयार झाली असली तर सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांसमोर एक प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे, हा प्रश्न म्हणजे विरोधकांच्या आघाडीचा चेहरा कोण असेल. विरोधकांच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनीसुद्धा हाच प्रश्न काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना विचारला. विरोधकांचं नेतृत्व कोण करणार, ‘इंडिया’चा चेहरा कोण असेल? असा प्रश्न विचारल्यानंतर खरगे म्हणाले, हा प्रश्न नेहमीच विचारला जातोय. मुंबईत होणाऱ्या बैठकीत आम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय घेणार आहोत. तिथे आम्ही आमच्या समन्वयकांची निवड करू. आमचं नेतृत्व कोण करणार हा प्रश्न सोडवणं फार अवघड नाही. (फोटो – काँग्रेस/ट्विटर)
-
या बैठकीला शरद पवारही उपस्थित होते. ही बैठक काल (१७ जुलै) पासून सुरू झाली आहे. परंतु, मुंबईतील काही कामांमुळे शरद पवार काल जाऊ शकले नाहीत. परंतु, आज सकाळीच ते बंगळुरूला दाखल झाले आणि बैठकीत हजेरी लावली. (फोटो – शरद पवार / ट्विटर)
-
शरद पवार हे आघाडीचे चेहरा असू शकतील असं म्हटलं जातंय. युपीएच्या काळातही युपीएचं अध्यक्षपद शरद पवारांकडे द्यावं अशी मागणी केली जात होती. त्यामुळे INDIA ची जबाबदारीही शरद पवारांकडे जाण्याची शक्यता आहे. (फोटो – शरद पवार / ट्विटर)
-
मुंबईत होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. (फोटो – शरद पवार / ट्विटर)
-
मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, आम्ही ११ जणांची समन्वय समिती बनवणार आहोत. या ११ जणांच्या बैठकीत ठरवलं जाईल की आमचा मुख्य समन्वयक कोण असेल. मुंबईत आमची बैठक होईल, तिथे याबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. आमचं नेतृत्व कोण करेल हा प्रश्न फारसा महत्त्वाचा नाही. हा तिढा खूप लवकर सुटेल. ‘इंडिया’ची पुढची बैठक महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे होईल. आम्ही आता २६ पक्ष एकत्र आलो आहोत. आधीच्या पाटणा येथील बैठकीत २० पक्ष आले होते. आमची २६ पक्षांची एकजूट पाहून पंतप्रधान मोदी आणि भाजपा चिंतेत आहे. (फोटो – शरद पवार / ट्विटर)
-
देशभरातील २६ पक्षांनी INDIA ला पाठिंबा दिला आहे. (फोटो – काँग्रेस/ ट्विटर)
-
आगामी लोकसभा निवडणुकीत INDIA विरुद्ध NDA अशी लढत रंगणार आहे. (फोटो – काँग्रेस/ ट्विटर)
-
INDIA मधील अनेक पक्षांचे एकमेकांसोबत वैचारिक मतभेद आहेत. परंतु, तरीही वैचारिक मतभेद बाजूला ठेवून हे पक्ष भाजपाविरोधात एकत्र आले आहेत. (फोटो – आप / ट्विटर)
-
त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक सर्वार्थाने आव्हानात्मक ठरणार आहे. (फोटो – आप / ट्विटर)
-
(फोटो – आप / ट्विटर)
![12 February 2025 Horoscope In Marathi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/12-February-2025-Horoscope.jpg?w=300&h=200&crop=1)
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य