-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात.
-
त्या सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहेत. त्या इन्स्टाग्रामवर विविध कार्यक्रमातील फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात.
-
आता त्यांनी मंगळागौर उत्सवाचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अमृतांचा पारंपारिक लूक पाहायला मिळत आहे.
-
नऊवारी साडी, नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर आणि पारंपारिक दागिन्यांमध्ये अमृता फारच सुंदर दिसत आहेत.
-
या समारंभात त्या फुगडी खेळल्या.
-
इतकंच नव्हे तर त्यांनी गाणंही गायलं.
-
वर्सोवा विधानसभा क्षेत्रात आयोजित या कार्यक्रमात ३ हजारपेक्षा जास्त महिला सहभागी झाल्या होत्या, असंही त्यांनी सांगितलं.
-
मराठमोळी नऊवारी साडी नेसून मंगळागौरीचे खेळ खेळले, फुगडी खेळली, उखाणा घेतला, असं अमृता कॅप्शनमध्ये म्हणाल्या.
-
अनेक महिलांसोबत सेल्फी काढली. महिलांशी भरभरून गप्पा मारल्या.
-
मन प्रफुल्लित झाले आणि भारतीय पारंपरिक सणाची मजाही अनुभवली, असं अमृता यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
-
(सर्व फोटो – अमृता फडणवीसांच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित