-
चांद्रयान ३ मोहीम यशस्वी झाली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स परिषदेसाठी दक्षिण अफ्रिकेत होते. ते भारतात परतातच आज (२६ जुलै) सकाळी त्यानी इस्रोच्या वैज्ञानिकांची भेट घेतली. (सर्व फोटो – नरेद्र मोदी / युट्यूब)
-
यावेळी पंतप्रधानांनी वैज्ञानिकांशी संवाद साधला. त्यांच्या अभूतपूर्व कार्याचं कौतुक करत त्यांचे आभारही मानले. आजच्या भाषणात नरेंद्र मोदी काय म्हणाले ते पाहुयात.
-
“आज तुमच्या भेटीला येऊन एक वेगळाच आनंद होत आहे. कदाचित असा आनंद खूप दुर्मिळ आहे. जेव्हा तन, मन आनंदाने भरलं असेल, व्यक्तीच्या जीवनात अशा घटना घडतात की ते फार उत्सुक होतात. यावेळी माझ्यासोबतही असंच घडलं.”
-
“मी साऊथ अफ्रिकेत होतो. पण माझं मन पूर्णपणे तुमच्यासकडे लागलं होतं. कधी कधी वाटतं की तुमच्यावर फार अन्याय करतो, कारण उत्कंठा माझी आणि अडचण तुम्हाला. सकाळ-सकाळी तुम्हाला मन करत होतं की जाऊ आणि तुम्हाला नमन करू. तुम्हाला अडचण आली असेल पण मी भारतात येताच लवकरात लवकर तुमचं भेट घ्यायची इच्छा होती. तुम्हा सर्वांना सॅल्युट करायचं होतं.”
-
“सॅल्युट तुमच्या परिश्रमाला, सॅल्युट तुमच्या धैर्याला, सॅल्युट तुमच्या मेहनतीला, सॅल्युट तुमच्या चिवटतेला, सॅल्युट तुमच्या प्रतिभेला. देशाला ज्या उंचीवर घेऊन गेला आहात, हे काही साधारण यश नाहीय, अनंत आंतरिक्ष भारताच्या वैज्ञानिक सामर्थ्याचे शंखनाद आहे.”
-
“इंडिया इज ऑन दि मून. वी हॅव अव्हर नॅशनल प्राईड प्लेस ऑन दि मून. आपण जिथे पोहोचलो आहेत जिथे कोणी पोहोचलं नाहीय. आपण ते केलंय जे याआधी कोणीही केलेलं नाही. हा आजचा भारत आहे, परीश्रमी भारत. हा तो भारत आहे जो नवा विचार करतो, नव्या पद्धतीने विचार करतो. डार्क झोनमध्ये जाऊनही जगात प्रकाश निर्माण करतो.”
-
“२३ ऑगस्टचा तो दिवस, तो क्षण अमर झाला आहे. या स्मृती कायम लक्षात राहतात. तो क्षण या शतकातालही प्रेरणादायी क्षणापैकी एक आहे. प्रत्येक भारतीयांना वाटत होतं की विजय त्यांचं स्वतःची आहे. प्रत्येकाने हे यश अनुभवलं. खूप मोठ्या परिक्षेत पास झाल्यासारखं भारतीयांना वाटलं.”
-
“मी तुम्हा सर्वांचं जितकं कौतुक करू ते कमीच आहे. मी ते फोटो पाहिलेत ज्यात आपल्या मुन लँडरने चंद्रावर मजबुतीने आपले पाय रोवले आहेत. एका बाजूला विक्रमचा विश्वास आहे, तर दुसरीकडे प्रज्ञानचा पराक्रम आहे. आपलं प्रज्ञान सतत चंद्रावर पदचिन्ह सोडत आहे. ते अद्भूत आहे. मानव जातीत, जगाच्या लाखो इतिहासात पहिल्यांदाच तो फोटो पाहत आहे. हा फोटो जगाला दाखवण्याचं काम भारताने केलं आहे. तुम्ही सर्व वैज्ञानिकांनी केलं आहे.”
-
“स्पेस मिशनच्या टच डाऊन पाँइंटला एक नाव देण्याची वैज्ञानिक परंपरा आहे. चंद्राच्या ज्या भागावर आपलं चंद्रयान उतरलं आहे, भारताने त्या जागेच्या नामकरणाचा निर्णय घेतला आहे. ज्या जागेवर चांद्रयान ३ चं मून लँडर उतरलं आहे त्या पाँइंटला शिवशक्तीच्या नावाने ओळखलं जाणार आहे.”
-
“शिवमध्ये मानवताच्या कल्याणाचा संकल्प आहे, आणि शक्तीमध्ये त्या संकल्पांना पूर्ण करण्यासाठी सामर्थ्य मिळते. चंद्रावरील शिवशक्ती पाँइंट हिमालयापासून ते कन्याकुमारी जोडल्याचा बोध करत आहे.”
-
“ज्या मनाने आपण कर्तव्य कर्म करतो, विचार आणि विज्ञानाला गती देतो आणि जे सर्वांमध्ये उपस्थित आहे, ते मन शुभ आणि कल्याणकारी संकल्पाशी जोडलेले राहावे.”
-
“मनाच्या या शुभ संकल्पांशी जोडले राहण्यासाठी शक्तीचा आशिर्वाद अनिवार्य आहे. ही शक्ती आपली नारी शक्ती आहे. निर्माणापासून ते प्रलयापर्यंत सृष्टीचा आधार नारी शक्तीच आहे. आपण सर्वांनी पाहिलं की चांद्रयान ३ मध्ये देशने आपल्या महिला वैज्ञानिकांनी देशाच्या नारी शक्तीने किती मोठी भूमिका पार पाडली आहे. चंद्राचा शिवशक्ती पाईंट वर्षानुवर्षे भारताचा हा वैज्ञानिक चिंतनाचा साक्षी बनणार आहे.”
-
“आणखी एक नामकरण गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. चार वर्षांपूर्वी चांद्रयान २ चंद्रापर्यंत पोहोचलं होतं, तेव्हा प्रस्ताव होता की त्या जागेचं नाव ठरवलं जाईल, पण त्यावेळी आम्ही ठरवलं होतं की जेव्हा चांद्रयान ३ यशस्वीरित्या चंद्रावर पोहोचेल तेव्हा आम्ही दोन्ही पाँईंटचं नाव एकत्र ठेवू. आज मला वाटतं की जेव्हा हरघर तिरंगा, हर मन तिरंगा आणि चंद्रावरही तिरंगा, तर तिरंगाशिवाय चांद्रयान २ शी संबंधित त्या जागेला दुसरं काय नाव देता येऊ शकतं? त्यामुळे चांद्रयान २ ने जिथे आपली पावलं ठेवली आहेत ती जागा आता तिरंगा या नावाने ओळखली जाणार आहे.”
-
हा तिरंगा पाँइंट आपल्याला शिकवण देईल की कोणतंही अपयश शेवटचं नसतं. जर दृढ इच्छाशक्ती असेल तर यश प्राप्त होतंच. म्हणजेच, चांद्रयान २ चे पदचिन्ह आहे ती जागा तिरंगा नावाने ओळखली जाईल. तर, ज्या ठिकाणी चांद्रयान ३ चे मून लँडर पोहोचलं आहे ती जागा आजपासून शिवशक्ती पाँइंट म्हणून ओळखले जाणार आहे.
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”