-
Shravani Somvar 2023: श्रावणातील तिसऱ्या सोमवारनिमित्त त्र्यंबक नगरीत श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन आणि ब्रम्हगिरी प्रदक्षिणेसाठी भाविकांनी गर्दी केली आहे.
-
त्र्यंबकेश्वर देवस्थानने गर्दीच्या पार्श्वभूमीवर, अतिविशेष (व्हीआयपी) दर्शन बंद ठेवले आहे.
-
कुशावर्त कुंडात डुबकी मारून भाविक ब्रम्हगिरी प्रदक्षिणेसाठी मार्गस्थ होतात.
-
त्र्यंबक नगरीत तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची झालेली गर्दी.
-
ज्या ब्रम्हगिरी पर्वताला प्रदक्षिणा घातली जाते, तो ढगांच्या दुलईत होता.
-
ब्रम्हगिरी प्रदक्षिणेत तरुणाईची संख्या अधिक असते.
-
ब्रम्हगिरी प्रदक्षिणेत युवती, महिलांचाही उत्साह वाखाणण्यासारखा असतो. कित्येक किलोमीटर अंतर त्या सहजपणे पार करतात.
-
प्रदक्षिणा मार्गावर विविध सामाजिक संस्थांनी ठिकठिकाणी भाविकांसाठी नाश्ता, फळे, चहा-पाणीची मोफत व्यवस्था केली होती.
-
राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने भाविकांच्या वाहतुकीसाठी २५० जादा बसची व्यवस्था करण्यात आली. या काळात खासगी वाहनांना त्र्यंबकेश्वरमध्ये प्रवेश बंद असतो. (सर्व छायाचित्रे – यतीश भानू)
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ