-
रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूरचा अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला असून परिसरातील वस्त्यांमध्ये पाणी शिरले.
-
शेकडो घरात पाणी शिरले. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर सुमारे ३ वाजता ही घटना घडली.
-
अंबाझरी तलावाच्या एका टोकाला असलेल्या विवेकानंद पुतळ्याजवळ तलावाचा विसर्ग पॉईंट आहे. तेथून वेगाने पाणी प्रथम रस्त्यावर आणि नंतर रस्त्यालगतच्या अंबाझरी लेआऊटमधील घरात शिरले.
-
याच वस्तीत अंधाची शाळा आहे.तेथे पाणी शिरले. मुलांना पहिल्या माळ्यावर हलवण्यात आले.
-
महापालिकेचे सुमारे ४० अधिकारी घटनास्थळी पोहचले असून वस्त्यांमधील पाणी काढले जात आहे.
-
सुरूवातीला तलाव फुटल्याची माहिती होती. पण महापालिका अग्निशमन विभागाने ती फेटाळली. तलाव ओव्हरफ्लो झाल्याचे सांगितले.
-
नागपुरातील सिताबर्डी परिसर व रस्ते आणि पाण्यात बुडालेला मोरभवन बस स्थानक व त्यामधील बसेस आणि बसेसमध्ये अडकलेली माणसे.
-
अभ्यंकर नगर मधील लोकांच्या घरातील वाहने वाहत गांधीनगर परिसरात आली आहे.
-
गांधीनगर येथील महापालिकेचे इंदिरा गांधी रुग्णालयात पाणी शिरल्यामुळे तेथील व्यवस्था कोलमडली.
-
शंकर नगरसह महावितरणचे अनेक सबस्टेशन पाण्यात; वीज पुरवठा खंडित
-
नागपूर शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर तलावाचे पाणी पसरल्याने रस्ते वाहतूक ठप्प आहे
-
या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती ट्वीटरद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
१ एप्रिल राशिभविष्य: अंगारकी विनायक चतुर्थीला बाप्पा कोणत्या राशीच्या पाठीशी उभा राहणार? कोणाला फायदा तर कोणाची इच्छापूर्ती होणार