-
मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय अर्थात राणीबागमध्ये दोन बछड्यांचा आज वाढदिवस साजरा करण्यात आला. (फोटो – दीपक जोशी)
-
गेल्यावर्षी ४ नोव्हेंबर २०२२ रोजी शक्ती आणि करिष्मा या जोडीने २ बछड्यांना जन्म दिला. (फोटो – इंडियन एक्स्प्रेस/संग्रहित फोटो)
-
जय आणि रुद्र अशी या ट्वीन बछड्यांची नावे आहेत. (फोटो – इंडियन एक्स्प्रेस/संग्रहित फोटो)
-
या ट्वीन बछड्यांचा आज पहिला वाढदिवस होता. (फोटो – दीपक जोशी)
-
“सुरुवातीचे दीड ते दोन वर्षे हे बछडे आईसोबतच राहतात”, अशी माहिती जीवशास्त्रज्ञ आणि जनसंपर्क अधिकारी अभिषेक साटम यांनी दिली. (फोटो – दीपक जोशी)
-
ते म्हणाले की, सुरुवातीचे दोन ते तीन महिने बछड्यांची काळजी घ्यावी लागते. (फोटो – दीपक जोशी)
-
या बछड्यांपैकी एक मोठा बछडा आता त्याच्या वडिलांसोबत पाण्यातही खेळतो. (फोटो – दीपक जोशी)
-
“आयुष्याच्या पहिल्याच वर्षी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणं येऱ्या-गबाळ्याचं काम नाही भावा… त्यासाठी लागतं वाघाचं काळीज आणि रुबाब! तो रक्तातच असायला हवा…!” अशी पोस्ट राणीबागेच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून करण्यात आली आहे.
.. (फोटो – दीपक जोशी) -
गेल्या काही दिवसांपासून राणीबागेत भेट देणाऱ्या पर्यटकांचीही संख्या वाढली आहे. (फोटो – दीपक जोशी)
-
राणीबागेतील दोन हॅण्डसम बॉय असंही विशेषण या बछड्यांसाठी वापरण्यात आलं आहे. (फोटो – themumbaizoo/ इन्स्टाग्राम)
-
(फोटो – themumbaizoo/ इन्स्टाग्राम)

महामार्ग वाहतूक कोंडीमुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल; संयुक्त कारवाईमध्ये महामार्गालगतची २०१ अतिक्रमणे हटविली