-
आज गुरुवार (दि.२३) कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठुराया आणि रखुमाईची सपत्नीक शासकीय महापूजा संपन्न झाली.
-
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला येथील शेतकरी बबन घुगे दाम्पत्याला महापूजेचा मान मिळाला.
-
हे शेतकरी दाम्पत्य मागील पंधरा वर्षापासून नियमितपणे वारी करत आहे.
-
देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर विठुरायाच्या महापूजेचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंना देवेंद्र फडणवीस यांनी ‘पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान। आणिक दर्शन विठोबाचे॥ अदभूत, आनंदी, अविस्मरणीय पहाट… सौभाग्य… विठ्ठलाची कृपा!’ असे कॅप्शन दिले आहे.
-
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
-
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, श्री विठ्ठलाची कृपा सदैव महाराष्ट्रावर राहू देत, सर्वांना सुखी ठेव हीच विठुरायाचरणी प्रार्थना ! पांडुरंग! पांडुरंग!! विठ्ठल विठ्ठल!
-
शासकीय महापूजा संपल्यानंतर तात्काळ विठ्ठल दर्शनास सुरुवात झाली.
-
टाळ, मृदंगांचा गजर आणि विठू नामाच्या जयघोषाने अवघी पंढरी दुमदुमून गेली.
-
आषाढी एकादशीप्रमाणे कार्तिक एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात भक्तांची मांदियाळी असते.
-
चंद्रभागेत स्नान करून भाविक आणि वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात.
-
(सर्व फोटो सौजन्य : देवेंद्र फडणवीस/सोशल मीडिया)

Pahalgam Terror Attack : गोळीबार सुरू होताच झाडावर चढून केलं संपूर्ण हल्ल्याचं रेकॉर्डिंग; स्थानिक व्हिडीओग्राफर बनला NIAचा प्रमुख साक्षीदार