-
माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांचा मुलगा करण सिद्धू विवाहबंधनात अडकला.
-
करण सिद्धूने गुरुवारी ७ डिसेंबर रोजी इनायत रंधावासोबत सप्तपदी घेतली.
-
यानंतर पटियाला येथे करण सिद्धू आणि इनायत रंधावा यांचे रिसेप्शन आयोजन करण्यात आले होते.
-
या कार्यक्रमाला अनेक राजकीय, सिनेसृष्टी आणि क्रिकेट जगतातील व्यक्तींनी हजेरी लावली.
-
नवज्योतसिंग सिद्धू यांनी या कार्यक्रमाचे काही फोटो शेअर केले होते. यात नवज्योत सिंग सिद्धू, करण सिद्धू आणि नववधू इनायत रंधावा दिसत आहे.
-
करण सिद्धूची पत्नी इनायत रंधावा ही पटियाला येथील रहिवासी आहे.
-
पटियाला येथील बडी आसामी अशी ओळख असलेल्या मनिंदर रंधावा यांची ती मुलगी आहे.
-
लष्करात सेवा बजावलेले मनिंदर रंधावा हे सध्या पंजाब संरक्षण सेवा कल्याण विभागात उपसंचालक पदावर कार्यरत आहेत.
-
तर करण सिद्धू हा पेशाने वकील आहे. त्याने एमिटी विद्यापीठातून एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले आहे.
२१ फेब्रुवारी राशिभविष्य: अनुराधा नक्षत्रात हातातील कामांना मिळेल यश तर कोणाला लाभेल जोडीदाराचा सहवास; वाचा तुमचा शुक्रवार कसा जाणार