-
संसदेचे हिवाळी अधिवेशन ४ डिसेंबरपासून सुरू झाले. अधिवेशन सुरू होताच दोन दिवसांनी म्हणजेच ६ डिसेंबर रोजी खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने एक व्हिडीओ प्रदर्शित करून खळबळ उडवून दिली होती.
-
१३ डिसेंबर रोजी संसद हल्ला प्रकरणाला २३ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने संसदेवर हल्ला केला जाईल असं त्याने या व्हिडीओच्या माध्यमातून म्हटलं होतं. एवढंच नव्हे तर त्या व्हिडीओमध्ये अफजल गुरुचाही फोटो लावण्यात आला होता. १३ डिसेंबर २००१ साली झालेल्या संसद हल्लाप्रकरणात अफजल गुरू याला भारताने फाशीची शिक्षा ठोठावली. संसदेच्या पायावर घाला घालू असं पन्नूने त्यावेळी म्हटलं होतं. (फोटो – लोकसभा लाईव्ह टीव्ही)
-
गुरपतवंतसिंग पन्नूने हा इशारा दिल्यानंतरच आज १३ डिसेंबर रोजी लोकसभेत गोंधळ झाला. लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून एकाने उडी सभागृहात उडी मारली. यामुळे काहीकाळ दहशत निर्माण झाली होती.परंतु, या राड्याप्रकरणी चौघांना ताब्यात घेतल्यानंतर लोकसभेतील कामकाज पूर्ववत करण्यात आलं.दरम्यान, हा प्रकार कोणी घडवून आणला याची चौकशी केली जात आहे. (Photo – MP Dr. Senthilkumar.S X Ac)
-
नव्या संसदेत आयोजित केलेल्या हिवाळी अधिवेशनाचे हे पहिलेच वर्ष आहे. तसंच, देशभरातील सर्व खासदार या एका छताखाली उपस्थित असताना येथे सुरक्षेचे तीनतेरा वाजले असल्याच्या प्रतिक्रिया काही लोकप्रतिनिधींनी दिली. (फोटो – लोकसभा लाईव्ह टीव्ही)
-
काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांनी सभागृहात घडलेला प्रसंग कथन केला. ते म्हणाले, “दोन लोकांनी प्रेक्षक गॅलरीतून लोकसभा सभागृहात उडी मारली. त्यांच्या हातात कॅन होते. त्यातून पिवळा धूर येत होता. दोघांपैकी एक जण अध्यक्षांच्या आसनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. दोघेही काहीतरी घोषणा देत होते. पण त्या मला समजू शकल्या नाहीत. पण दोन लोक सुरक्षा भेदून आतमध्ये येतात, सभागृहात उड्या मारून धूर सोडतात, याला काय म्हणायचे. कदाचित हा धूर विषारीही असला असता किंवा स्मोक बॉम्बही असू शकला असता. आजच्या दिवशीच १३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवर हल्ला झाला होता. त्यामुळे याच दिवशी पुन्हा अशाप्रकारे घुसखोरी होणे, हे खूपच गंभीर आहे.” (फोटो – लोकसभा लाईव्ह टीव्ही)
-
आज सकाळीच आम्ही २००१ च्या हल्लाचे स्मरण करून शहीदांना अभिवादन केले. आज नव्या संसद भवनातही हल्ला झाला. त्यामुळे सुरक्षेत हलगर्जीपणा झाला, हे सत्य आहे”, असं काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले. (फोटो – लोकसभा लाईव्ह टीव्ही)
-
शिवसेना उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत यांनीही या प्रसंगाचे वर्णन केले. ते म्हणाले, शून्य प्रहराचे कामकाज तेव्हा चालू होते. दोन इसम प्रेक्षक गॅलरीतून उठले आणि सभागृहात असलेल्या खांबाला लटकत होते. त्यानंतर त्यांनी खाली उडी मारली. उडी मारल्यानंतर त्यांनी बाकावरून उड्या मारायला सुरुवात केली. खासदारांनी चारही बाजूंनी त्यांना घेरल्यानंतर त्यांची धांदल उडाली. त्याच्यातील एकाने पायातील बुट काढले, तोपर्यंत खासदारांनी त्याला पकडले. दुसऱ्याला इसमालाही खासदारांनीही पकडले. दरम्यान सभागृहात पिवळ्या रंगाचा धूर पसरला. कदाचित तो धूर त्या बुटातून येत होता.” (फोटो – लोकसभा लाईव्ह टीव्ही)
-
दरम्यान, या राड्यामुळे २००१ साली झालेल्या हल्ल्याचे स्मरण सगळ्यांना झाले आहे. (फोटो – लोकसभा लाईव्ह टीव्ही)
-
आजच्या घटनेमुळे संसदेची सुरक्षा धोक्यात आली असल्याचंं अनेकांच म्हणणं आहे. (Photo – MP Dr. Senthilkumar.S X Ac)

लोकांच्या जीवाशी खेळ! कलिंगड विकत घेताना आता १०० वेळा विचार कराल; VIDEO पाहून तर झोप उडेल