-
मकर संक्रांती २०२४ च्या शुभ मुहूर्तावर स्नान आणि दान करण्याची परंपरा आहे. याशिवाय या दिवशी गायींची सेवा करण्याचीही पद्धत असते.
-
हिंदू परंपरा आणि श्रद्धेनुसार गायीला मातेचा दर्जा आहे.
-
या खास सणानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींना, त्यांच्या निवासस्थानी गायींची सेवा करताना पाहू शकतो.
-
यावेळी पंतप्रधान मोदींनी, गायींना चारा खायला घातला.
-
गायींची सेवा करताना , पंतप्रधान मोदींचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
या छायाचित्रांमध्ये पंतप्रधान मोदी, स्वत:च्या हाताने एक-एक करून गायींना चारा देत असल्याचे तुम्ही पाहू शकता.
-
अनेक गायीही पंतप्रधान मोदींभोवती फिरताना दिसत आहेत.
-
पंतप्रधान मोदी हेदेखील या गायींना सांभाळताना दिसतात.
-
छायाचित्रांमध्ये दिसणाऱ्या या गायींचे पालन हे पीएमओमध्येच करण्यात आले आहे.
-
या गायी, सामान्य गायींपेक्षा वेगळ्या आहेत. त्यांची जात आणि रचना देखील सामान्य गायींपेक्षा वेगळी आहे.
-
दक्षिण भारतात विकसित झालेल्या पुंगनूर जातीच्या या गायी आहेत.
-
ही जगातील सर्वात लहान गाय असल्याचे सांगितले जाते. त्यांची उंची साधारणतः ३ ते ५ फूट असते. (फोटो स्रोत: पीटीआय)
(हे पण वाचा: तासांचे अंतर आता मिनिटांत होणार पूर्ण, जाणून घ्या मुंबईतील अटल सेतूचे वैशिष्ट्ये)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”