-
बहुप्रतीक्षित मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) हा मुंबईतील अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. या पुलामुळे मुंबई – नवी मुंबई दरम्यान वाहतूक सुरळीत होणार आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ या प्रकल्पाला अटल सेतू असे नाव देण्यात आले आहे. १७,८४३ कोटी रुपयांच्या या पूलाची काही अद्वितीय अशी वैशिष्ट्ये आहेत, ती पाहूया:
-
हा पूल सुमारे २१.८ किमी (सुमारे १४ मैल) लांब आहे. जो भारतातील सर्वात लांब सागरी पुलांपैकी एक असून; जगातील १२ वा सर्वात लांब पूल आहे. (पीटीआय फोटो)
-
या सेतूचा सुमारे १६.५ किमी भाग समुद्रावर आणि ५.५ किमी जमिनीवर आहे. (पीटीआय फोटो)
-
सेतूवर वेग मर्यादा १०० किमी प्रति तास असेल. (पीटीआय फोटो)
-
प्रत्येक ३३० मीटरवर कॅमेरे बसवलेले आहेत. सुरक्षेसाठी पहिल्या ४ किमीमध्ये अतिरिक्त बरियर्स बसवले आहेत. (पीटीआय फोटो)
-
सुरुवातीच्या १० किमी नंतर, प्रवाशांना मुंबईच्या स्कायलाइन आणि एलिफंटा लेण्यांच्या नयनरम्य दृश्यांचा आनंद घेता येईल. (पीटीआय फोटो)
-
मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) अंदाज व्यक्त केला आहे की दररोज ७०,००० वाहने या लिंकचा वापर करतील. (पीटीआय फोटो)
-
सहा लेन लिंक, तीन बांधकाम भागांमध्ये विभागले गेले आहे. ज्यामध्ये L&T-IHI कंसोर्टियमने विकसित केलेले १०.३८ किमी, देवू-टाटा जेव्हीने ७.८०७ किमी आणि L&T द्वारे ३.६ किमी विकसित केले आहे. (पीटीआय फोटो)
-
हिरानंदानी म्हणतात की MTHL, ३०० किलोमीटरचा मेट्रो ट्रॅक आणि नवीन विमानतळ, मुंबईच्या पायाभूत सुविधा पुढील दोन वर्षांत मोठा बदल होण्यास सज्ज आहेत. (पीटीआय फोटो)
-
टाटा रियल्टीचे, दत्त पुढे म्हणाले की २० दशलक्ष एमएमआर लोकसंख्येचा आकार पाहता, पायाभूत सुविधांच्या विकासास नक्कीच मदत होईल. (पीटीआय फोटो)

पदरात पडेल सुख ते हितशत्रूंपासून रहा सावध; प्रदोष व्रताबरोबर अनंग त्रयोदशीचा योगायोग तुमच्या आयुष्यात भरणार का नवे रंग? वाचा राशिभविष्य