-
अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या रामलल्लाच्या अभिषेकची तयारी पूर्ण झाली आहे. (फोटो: अयोध्या वासी/फेसबुक)
-
अभिषेक सोहळ्यासाठी राम मंदिराला फुलांनी आणि दिव्यांनी सजवण्यात आले आहे. (फोटो: अयोध्या वासी/फेसबुक)
-
दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघालेले राम मंदिर. (पीटीआय फोटो)
-
या चित्रांमध्ये मंदिराची वैभवात आपण पाहू शकतो. (फोटो: @ShriRamTeerth/Twitter)
-
फुलांच्या सजावटीने मंदिराचे प्रांगण खुलून दिसत आहे. (फोटो: अयोध्या वासी/फेसबुक)
-
राम मंदिरातील हे दृश्य डोळे दिपवणारे आहे. (फोटो: @ShriRamTeerth/Twitter)
-
मंदिराच्या बाह्यभागाचे फोटोदेखील अतिशय सुंदर दिसतात. (पीटीआय फोटो)
-
मंदिराच्या सजावटीसाठी वापरण्यात येणारी फुले कलकत्त्याहून आणण्यात आली आहेत. (फोटो: अयोध्या वासी/फेसबुक)
-
मंदिराचा प्रत्येक भाग या फुलांनी सजवण्यात आला आहे. (फोटो: @ShriRamTeerth/Twitter)
-
मंदिराला सजवण्यासाठी फुलांची खास रचना तयार करण्यात आली आहे. (फोटो: @ShriRamTeerth/Twitter)
-
या फुलांमुळे मंदिराचे सौंदर्य आणि भव्यता आणखी वाढली आहे. (फोटो: अयोध्या वासी/फेसबुक)
-
मंदिर आणि परिसराच्या सुशोभिकरणासाठी, मंदिराचे सुरू असलेले बांधकाम बंद करण्यात आले आहे. (फोटो: अयोध्या वासी/फेसबुक)
-
२२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच पुन्हा कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. (फोटो: @ShriRamTeerth/Twitter)
-
मंदिराच्या सजावटीसोबतच, अयोध्येत सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. (फोटो: @ShriRamTeerth/Twitter)
-
श्री रामजन्मभूमीच्या सुरक्षेसाठी अनेक जवान तैनात करण्यात आले आहेत. (फोटो: @ShriRamTeerth/Twitter)
-
नागर शैलीत बांधल्या जाणाऱ्या या तीन मजली राम मंदिरात, सुरक्षेच्या कारणास्तव सर्वसामान्यांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. (फोटो: अयोध्या वासी/फेसबुक)
-
त्याचबरोबर अयोध्येत अवजड वाहनांच्या प्रवेशावरही बंदी घालण्यात आली असून ती २३ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. (फोटो: अयोध्या वासी/फेसबुक)
-
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी हळूहळू पाहुणे अयोध्येत पोहोचू लागले आहेत. (फोटो: अयोध्या वासी/फेसबुक)
-
ज्यांच्याकडे प्राणप्रतिष्ठेत सहभागी होण्याचे निमंत्रण पत्र असेल, अशा व्यक्तींना अयोध्येत प्रवेश मिळणार आहे. (फोटो: @ShriRamTeerth/Twitter)
-
गाभार्यात रामाच्या बालस्वरूपाची मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. परंतु मूर्ती अद्याप झाकलेली आहे. (फोटो: अयोध्या वासी/फेसबुक)
-
रामलल्लाची ही ५१ इंचाची मूर्ती, म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवली आहे. (फोटो: @ShriRamTeerth/Twitter)
-
१६ जानेवारीपासून मूर्तीच्या अभिषेकाशी संबंधित सर्व विधी सुरू झाले आहेत. (फोटो: अयोध्या वासी/फेसबुक)
-
प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी केवळ ८४ सेकंदाचा शुभ मुहूर्त आहे. (फोटो: @ShriRamTeerth/Twitter)
-
ही वेळ २२ जानेवारी रोजी १२:२९ मिनिटे ८ सेकंद ते १२:३० मिनिटे ३२ सेकंद अशी असेल. (फोटो: @ShriRamTeerth/Twitter)
-
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ जानेवारीला सकाळी रामनगरीत पोहोचतील. (फोटो: @ShriRamTeerth/Twitter)
(हे पण वाचा: मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे उद्घाटन झालेल्या, भारतातील सर्वात लांब सागरी पुलाचे सुंदर फोटो पाहा )

आता दु:खाचे दिवस संपणार! चैत्र पौर्णिमेच्या आधी ‘या’ राशींच्या दारी पैसा येईल चालून? रखडलेली कामे होऊ शकतात पूर्ण