-
अयोध्येच्या राम मंदिरात रामलल्ला विराजमान झालेले आहेत. प्राणप्रतिष्ठेनंतर रामलल्लाचा दरबार २३ जानेवारीपासून जनतेसाठी खुला करण्यात आला आहे.
-
भारतातील अनेक राज्यातून लोक प्रभू रामाच्या दर्शनासाठी आले आहेत. प्रभू रामाच्या दर्शनासाठी पहाटे ३ वाजल्यापासून भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
-
मंदिराचे दरवाजे उघडताच लोकांची मंदिरात जाण्यासाठी झुंबड उडाली.
-
मंदिराचे दरवाजे उघडताच भाविकांनी ‘जय श्री राम’ असा जयघोष करत मंदिरात प्रवेश केला.
-
दर्शनासाठी नागरिकांची गर्दी झाली असून त्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
-
पहिलाच दिवस असल्याने काहीसा गोंधळ उडाला. जमाव नियंत्रणाबाहेर गेल्याने अतिरिक्त पोलिस बंदोबस्त मागवण्यात आला.
-
येत्या काही दिवसांत येथे मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
-
२२ जानेवारीला राम मंदिराच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामलल्लाच्या मूर्तीवर अभिषेक केला होता.
-
पंतप्रधान मोदींनी पुजार्यांसोबत मुख्य विधी पार पाडले होते. यावेळी देशातील अनेक नामवंत व्यक्ती अयोध्येत पोहोचल्या होत्या. या कार्यक्रमात सुमारे ७००० लोक सहभागी झाले होते. (फोटो स्रोत: पीटीआय)
(हे देखील वाचा: अयोध्येच्या राम मंदिराचे मनाला भुरळ घालणारे, सुंदर फोटो पाहा… )

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”