-
आज भारत आपला ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत.
-
गुरुवारी २५ जानेवारी रोजी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष जयपूरमध्ये दाखल झाले आणि त्यांनी या पिंक सिटीतील आमेर किल्ला, जंतरमंतर आणि हवा महलला भेट दिली.
-
यावेळी इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याबरोबर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही होते. दोन्ही नेत्यांनी एकत्र शोभा यात्रेत भाग घेतला. त्यांच्या जयपूर भेटीतील खास क्षणांवर एक नजर टाकुयात (फोटो: PTI)
-
मॅक्रॉन यांनी जयपूरमधील आमेर किल्ल्याला भेट दिली. (फोटो: पीटीआय)
-
जंतरमंतरवर पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन. (फोटो: पीटीआय)
-
फ्रान्सचे नेते प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची ही सहावी वेळ आहे. (फोटो: पीटीआय)
-
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना निमंत्रित करण्यात आलं होतं, पण ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे भारताने मॅक्रॉन यांना प्रजासत्ताक दिनाचे निमंत्रण दिले. (फोटो: पीटीआय)
-
दोन्ही नेत्यांनी मिळून जयपूरमधील स्थानिक बाजारपेठेला भेट दिली. (फोटो: पीटीआय)
-
दोन्ही नेत्यांनी कुल्हड चहाचा आस्वाद घेतला. (फोटो: पीटीआय)
-
पंतप्रधान मोदींनी अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती मॅक्रॉन यांना भेट दिली. (फोटो: पीटीआय)
-
प्रसिद्ध हवा महलच्या समोर उभे राहून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सेल्फी घेताना मॅक्रॉन. (फोटो: पीटीआय)
-
मॅक्रॉन यांचा दौरा भारत-फ्रान्स संबंधांसाठी महत्त्वपूर्ण आहे. (फोटो: पीटीआय)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”