-
IAS अधिकारी टीना डाबी यांची लहान बहीण व IAS अधिकारी रिया डाबी लग्नबंधनात अडकल्या आहेत.
-
रिया डाबी यांनी IPS अधिकाऱ्याशी लग्न केलं आहे.
-
IAS रिया डाबी व IPS मनीष कुमार यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.
-
रिया डाबी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लग्नाचे फोटो शेअर केले.
-
दोघांनी दुसऱ्यांदा लग्न केलंय. यापूर्वी त्यांनी कोर्ट मॅरेज केलं होतं.
-
रिया डाबी या राजस्थान कॅडरच्या अधिकारी आहेत.
-
तर मनीष कुमार हे महाराष्ट्र कॅडरचे अधिकारी होते. नंतर त्यांनी राजस्थान कॅडर बदलून घेतलं.
-
या दोघांची प्रेमकहाणी मसुरीत सुरू झाली. या दोघांची पहिली भेट लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन मसुरी इथं झाली होती.
-
यूपीएससी परीक्षेत यश मिळवल्यानंतर रिया आणि मनीष येथे प्रशिक्षणासाठी आले. दोघांचीही पहिल्या भेटीत मैत्री झाली.
-
त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. मसुरीतील प्रशिक्षण पूर्ण करून दोघेही आपापल्या पोस्टिंगवर गेले.
-
रिया डाबी यांना पहिली पोस्टिंग अलवरमध्ये मिळाली तर मनीष यांना महाराष्ट्रातील उस्मानाबादमध्ये (धाराशिव) मिळाली होती.
-
आयएएस रिया डाबी यांच्या प्रेमात असलेल्या आयपीएस मनीष कुमार यांनी केंद्र सरकारकडे अर्ज पाठवून त्यांचे कॅडर बदलण्याची मागणी केली.
-
गृहमंत्रालयाला लिहिलेल्या अर्जात त्यांनी महाराष्ट्राऐवजी राजस्थान कॅडरची मागणी केली.
-
जून २०२३ मध्ये गृह मंत्रालयाने त्यांचा अर्ज स्वीकारला. यादरम्यान रिया आणि मनीष यांनी एप्रिल २०२३ मध्ये कोर्ट मॅरेज केल्याचे समोर आले.
-
लग्नानंतरच त्यांनी कॅडर बदलण्याची मागणी केली होती.
-
दरम्यान, रिया व मनीष दोघेही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करत असतात.
-
आयएएस टीना डाबी यांच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमालाही मनीष कुमार यांनी हजेरी लावली होती.
-
याशिवाय ते बऱ्याचदा फॅमिली फोटो शेअर करत असतात. (सर्व फोटो- रिया डाबी व मनीष कुमार यांच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

३ मार्च पंचांग: विनायक चतुर्थीला मेष ते मीनपैकी ‘या’ राशींना बाप्पा पावणार; तुमचा दिवस असेल का आनंदी? वाचा राशिभविष्य