-
देशात लोकसभेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला निवडणूक कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला.
-
केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक कार्यक्रम जाहीर करताना राजीव कुमार यांनी ही निवडणूक ऐतिहासिक ठरणार असल्याचं सांगितलं. यंदाच्या निवडणुकीत काही महत्त्वाच्या गोष्टी घडणार आहेत.
-
१९ एप्रिलपासून सात टप्प्यातील मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यातील निवडणूक अधिसूचना २० मार्च रोजी निघणार आहे.
-
अधिसूचना निघाल्यानंतर उमेदवारी अर्ज, उमेदवारी अर्जांची छाननी आणि मग उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पार पडली की १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडेल.
-
सात टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.
-
दरम्यान, हा कार्यक्रम जाहीर करताना निवडणूक आयोगाने या निवडणुकीतील काही महत्त्वाचे मुद्देही विषद केले. त्यानुसार, आता घरबसल्याही मतदान करता येणार आहे.
-
निवडणूक आयोगाने १८ व्या लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. देशात लोकसभा २०२४ च्या निवडणुका सात टप्प्यात होणार आहेत. (संग्रहित फोटो)
-
आत्तापर्यंत ४०० विधानसभा निवडणूका झालेल्या आहेत. १६ राष्ट्रपती, उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूका झाल्या आहेत. गेल्या वर्षभरात ११ विधानसभा निवडणूका झाल्या आहेत.
-
निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात एकूण ९६.८ कोटी मतदारांची संख्या आहे. यामध्ये ४९.७ कोटी पुरुष आणि ४७ कोटी महिला मतदार आहेत.
-
५ लाख मतदान केंद्र आहेत, १.५ कोटी निवडणूक कर्मचारी आहेत. तर, ५० लाख ईव्हीएम आहेत.
-
१.८ कोटी नवमतदार आहेत जे आता मतदान करणार आहेत, अशीही माहिती कुमार यांनी दिली.
-
ज्यांचे वय ८५ वर्षापेक्षा जास्त असेल, दिव्यांगांमध्ये ज्यांची श्रेणी ४० टक्क्यांपेक्षा जास्त असेल आणि त्यांनी फॉर्म १२ डी च्या माध्यामातून नोंदणी केली तर घरी जाऊन त्यांचे मतदान घेतले जाईल.
-
Know Your Candidate या अॅपलिकेशन द्वारे उमेदवाराची माहिती मिळणार. उमेदवार गुन्हेगारी स्वरुपाचा असेल तर वर्तमानपत्रात गुन्ह्यांची माहिती द्यावी लागणार.
-
मतदार यादीत महिलांचं प्रमाण वाढत आहे. १२ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत महिला मतदारांचे प्रमाण पुरुष मतदारांपेक्षा अधिक आहे. यंदाच्या निवडणुकीत ८५ लाखांहून अधिक महिला मतदार सहभागी होतील.
-
तर यंदाच्या निवडणुकीत निवडणूक आयोगाने ४ एम आव्हाने सांगितली आहेत. मसल (गुन्हेगारी), मनी (पैसा), Missinformation (चुकीची माहिती), MCC (आचारसंहितेचा भंग) यावर निवडणूक आयोग जाणीवपूर्वक लक्ष ठेवणार आहे.

‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई