-
पाकिस्तानी आणि भारतीय सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर सुफी मलिक आणि अंजली चक्र या लेस्बियन जोडप्याने ब्रेकअपची घोषणा केली आहे.
-
काही दिवसांनी दोघींचं लग्न होणार होतं. पण आता त्यांचं लग्न रद्द झालं आहे.
-
दोघींनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत विभक्त होण्याचा निर्णय सांगितला आहे.
-
सुफीने केलेल्या फसवणुकीमुळे हे लग्न मोडत असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
-
या दोघी पाच वर्षांहून जास्त काळापासून रिलेशनशिपमध्ये होत्या.
-
या दोघी विभक्त झाल्या आहेत, पण त्यांची प्रेमकहाणी खूपच रंजक होती.
-
सुफी मलिक आणि अंजली चक्र यांची पहिली भेट कॅलिफोर्नियात टम्बलरवर झाली.
-
अंजली एक इव्हेंट प्लॅनर आहे.
-
तर, सुफी मलिक एक कलाकार आहे.
-
दोघींची या नात्यात येण्याच्या ७ वर्षांपूर्वी ऑनलाइन भेट झाली होती.
-
त्यांची मैत्री टम्बलरवर एकमेकींच्या ब्लॉगला फॉलो करण्यापासून सुरू झाली आणि नंतर त्या इन्स्टाग्रामवर कनेक्ट झाल्या.
-
अंजलीने एके दिवशी सुफीला तिच्या अनुभवाबद्दल बोलू शकतो का आणि सुफीने होकार दिला.
-
जुलै २०१८ पासून त्या दोघी सोबत होत्या.
-
ही जोडी २०१९ मध्ये व्हायरल झाली जेव्हा त्यांनी एका ब्रँड फोटो शूटमध्ये भाग घेतला.
-
त्यांनी एका ब्रँडच्या फोटो शूटमध्ये भाग घेतला होता.
-
हे शूट ‘बॉरो द बाजार’ नावाच्या ब्रँडसाठी होते, जे खास प्रसंगी लोकांना दक्षिण आशियाई कपडे भाड्याने देतात.
-
अंजली आणि सुफी एका वीकेंडला लग्नाला गेल्या होत्या.
-
तिथे लग्नात घालण्यासाठी मोफत कपड्यांच्या बदल्यात त्यांनी ब्रँडसाठी फोटोशूट केले.
-
मग ट्विटरवरून हे फोटो इतके व्हायरल झाली की काही दिवसांतच ते भारत, पाकिस्तान आणि यूकेमधील न्यूज वेबसाइट्स, पेपर्स आणि टीव्हीवर झळकले.
-
लोकांना हे लेस्बियन कपल खूप आवडू लागले आणि त्या दोघी दक्षिण आशियाई कपल म्हणून प्रसिद्ध झाल्या.
-
सूफी ही पाकिस्तानी मुस्लीम असून अंजली भारतीय हिंदू आहे. दोघींनी जवळपास सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर आता ब्रेकअप करत असल्याचं सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे. (फोटो- अंजली चक्र इन्स्टाग्राम)

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती