‘भारतरत्न’ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.जयंतीनिमित्त हजारो अनुयायी आजपासूनच (१३ एप्रिल) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादरमधील चैत्यभूमीतील स्मृतीस्थळी अभिवादन करण्यासाठी येत आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंक शनिवारी (१३ एप्रिल) उजळून निघाला.प्रशासनाने वांद्रे-वरळी सी लिंकवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रांची विद्युत रोषणाई केली आहे. यात लेझर शोमधून बाबासाहेबांचे दोन छायाचित्र दिसत आहेत. या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित अनोखं अभिवादन करण्यात आलं आहे.तिरंगा झेंडा आणि बाबासाहेबांचे छायाचित्र असलेली ही विद्युत रोषणाई रात्रीच्या अंधारात अतिशय आकर्षक दिसत आहे.डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना चैत्यभूमीतील स्मृतीस्थळी अभिवादन करताना अनुयायी.चैत्यभूमी व आसपासच्या परिसरातून अनुयायी वांद्रे-वरळी सी लिंकवरील या दृश्याचा आनंद घेत आहेत.(सर्व फोटो- Express Photo by Ganesh Shirsekar)