-
टायटॅनिक जहाज पूर्ण झाले तेव्हा त्याची जगभरात चर्चा झाली. या जहाजावरील पहिल्या प्रवासासाठी अनेकांनी तिकिटे खरेदी केली होती. तर अनेकांना तिकिटे न मिळाल्याने त्यांची निराशादेखील झाली होती. (फोटो स्त्रोत: @rmstitanicofficial/Instagram)
-
१० एप्रिल १९१२ रोजी टायटॅनिक हे सर्वात मोठे प्रवासी जहाज साउथॅम्प्टन येथून न्यूयॉर्कच्या प्रवासासाठी निघाले होते. (फोटो स्त्रोत: @rmstitanicofficial/Instagram)
-
चार दिवसांच्या प्रवासानंतर १४ एप्रिल १९१२ रोजी, रात्री ११:४० वाजता हे प्रवासी जहाज हिमखंडावर आदळले. (फोटो स्त्रोत: @rmstitanicofficial/Instagram)
-
टक्कर झाल्यानंतर सुमारे २ तास ४० मिनिटांनी हे जहाज १५ एप्रिल १९१२ रोजी, उत्तर अटलांटिक महासागरात पूर्णपणे बुडाले. (फोटो स्त्रोत: @rmstitanicofficial/Instagram)
-
वाफेवर चालणाऱ्या टायटॅनिक जहाजाच्या पहिल्या प्रवासात एकूण २२४० प्रवासी सहभागी झाले होते. या प्रवाशांव्यतिरिक्त, जहाजावर काम करणारे इतर कर्मचारी सदस्यदेखील जहाजावर हजर होते. (फोटो स्त्रोत: @rmstitanicofficial/Instagram)
-
या अपघातात सुमारे १५०० लोकांचा मृत्यू झाला होता. आज या घटनेला ११२ वर्षे पूर्ण झाली आहेत. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सागरी अपघात मानला जातो. (फोटो स्त्रोत: @rmstitanicofficial/Instagram)
-
टायटॅनिक दुर्घटनेची इतिहासाच्या पानांमध्ये नोंद झाली आहे जी पुढील अनेक वर्षे स्मरणात राहील. पण तुम्हाला टायटॅनिक या जहाजाचे पूर्ण नाव माहित आहे का? (फोटो स्त्रोत: @rmstitanicofficial/Instagram)
-
या जहाजाचे पूर्ण नाव ‘RMS Titanic’ होते, ज्यामध्ये RMS म्हणजे ‘रॉयल मेल शिप’. (फोटो स्त्रोत: @rmstitanicofficial/Instagram)
(हे देखील वाचा: Skin care : उन्हाळ्यातही चेहरा दिसेल टवटवीत अन् चमकदार! ‘चहा’ करेल तुमची मदत; टीप पाहा )

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”