-
पुणे नजीक सातारा रोड परिसरात आज सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली.
-
अचानक झालेल्या पावसाच्या तुफान फटकेबाजीमुळे नागरिकांची चांगलीच फजिती झाल्याची पाहायला मिळालं.
-
ऐन मे महिन्याच्या कडक उन्हात अचानक बरसलेल्या या पावसाने नागरिकांना उकाड्यापासून थोडा दिलासाही मिळाला आहे.
-
पण दुसऱ्या बाजूला या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांना चिंतेत टाकलं आहे.
-
शेतीपिकांचं नुकसान होण्याची भीती शेतकरी वर्ग व्यक्त करत आहे.
-
मुख्यतः साताऱ्याच्या पाटण मधील काही भागात या पावसानं अचानक हजेरी लावली.
-
दमदार पाऊस पडला असल्याने थोड्याच वेळात अनेक ठिकाणच्या रस्त्याच्या दुतर्फा पाणी साचल्याचे पाहायला मिळाले.
-
यावेळी रस्त्यांवरून पाणी ओसंडून वाहत असल्याने काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते.
-
(All Photos- Express Photo By Pavan Khengre.)

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य