-
मुंबईमध्ये सोमवारी दुपारी आलेल्या जोरदार वादळासह अवकाळी पावसाने मुंबईकरांची तारांबळ उडाली होती. ठिकठिकाणी वादळामुळे झाडं पडली होती पण घाटकोपरमधील दुर्घटना ही अत्यंत भीषण ठरली.(दीपक जोशी/ एक्सस्प्रेस फोटो)
-
एनडीआरएफचे सहाय्यक कमांडंट निखिल मुधोळकर यांनी आज १४ मेला घाटकोपरच्या दुर्घटनेबाबत अपडेट दिला आहे. त्यांनी सांगितले की, “या घटनेत एकूण १४ जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. एकूण ८८ लोकांना वाचवण्यात आलं असून जखमींपैकी ३१ जणांना सध्या डिस्चार्ज देण्यात आला आहे.”(ANI/ दीपक जोशी/ एक्सस्प्रेस फोटो)
-
घाटकोपरमध्ये पडलेल्या या होर्डिंगखाली जवळपास ८० हून अधिक गाड्या आणि १०० पेक्षा अधिकजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती. (दीपक जोशी/ एक्सस्प्रेस फोटो)
-
NDRF सह स्थानिक नागरिकांनी सुद्धा मदत करत अनेक जणांना वाचवले. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल केले. (दीपक जोशी/ एक्सस्प्रेस फोटो)
-
होर्डिंग कोसळल्यानंतर तत्परतेने चालू झालेल्या बचावकार्यात आलेल्या अडचणींविषयी निखिल यांनी सांगितले की, “होर्डिंग पेट्रोल पंपावर पडले असल्याने आम्हाला ते कापण्यासाठी आमचे गॅसोलीन बेस कटर वापरता येत नव्हते परिणामी बचावकार्यात वेळ गेला.” (फोटो: ANI)
-
दरम्यान, घाटकोपरमधील या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळांची पाहणी करत चौकशीचे निर्देश दिले होते.(दीपक जोशी/ एक्सस्प्रेस फोटो)
-
घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारच्यावतीने पाच लाखांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.(दीपक जोशी/ एक्सस्प्रेस फोटो)
-
या घटनेसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनीही माहिती देत या घटनेची उच्चस्तरिय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे सांगितले. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
दुसरीकडे, BMC ने जारी केलेल्या निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, पंत नगर येथील ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील पेट्रोल पंपावर असलेले हे होर्डिंग हे अनधिकृत असून यासाठी महापालिकेने परवानगी दिलेली नव्हती.(फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी