-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.
-
यावेळी एका रॅलीचं आयोजन देखील करण्यात आलं होतं.
-
उत्तर प्रदेशच्या वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ते वाराणसीमधून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत.
-
यावेळी भाजपा आणि एनडीएमधील घटक पक्षांचे प्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थिती होते.
-
महाराष्ट्रातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही यावेळी तिथे हजर होते.
-
सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचीही तिथे उपस्थिती पाहायला मिळाली.
-
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, राजनाथ सिंह आणि इतरही पदाधिकारी त्याठिकाणी दिसले.
-
दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालभैरव मंदिरात पूजा केली आणि गंगा पात्राचेही पूजन केले.
-
अर्ज दाखल केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट लिहीली आहे.
-
पंतप्रधान मोदी पोस्टमध्ये काय म्हणाले?
“बाबा विश्वनाथांच्या नगरीतील देवरूप जनतेला वंदन आणि नमस्कार! आज माझ्या अस्तित्वाचा प्रत्येक क्षण हा काशीच्या प्रत्येक कणाला नमस्कार करत आहे. आजच्या रोड शोमध्ये मला तुमच्या सर्वांकडून मिळालेला स्नेह आणि आशीर्वाद खूप अतुलनीय आहेत. त्यामुळे मी भारावून गेलो आहे आणि काहीसा भावूकही झालो आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेमाच्या सावलीत १० वर्षे कशी गेली कळलेच नाही. गंगा मातेने मला बोलावले होते. आज आई गंगेने मला दत्तक घेतले आहे”, असं मोदींनी म्हटलं आहे. -
भाजपाने या निवडणुकीमध्ये ४०० पारचा नारा दिलेला आहे. याचा उल्लेखही अनेकदा पंतप्रधानांनी भाषणात केला. इंडिया आघाडीच्यावतीने देशात आघाडीचे सरकार येईल, असा दावा केला जात आहे.
-
त्यामुळं ४ जूनला लागणाऱ्या निकालाकडे सबंध देशाचं लक्ष लागलं आहे.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”