-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईत आज बुधवारी (१५ मे) सांयकाळी रोड-शो होणार आहे. त्यांच्या या रोड शो ची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. सर्व फोटो- (Express photos by Pradip Das, and Deepak Joshi)
-
आज त्यांचा मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी एक रोड-शो आयोजित करण्यात आला आहे.
-
दुपारी चार वाजता सुरु होणाऱ्या या रोड-शोचं आयोजन मुंबई भाजपाकडून करण्यात आलं आहे. मोदींच्या या रोड-शोची मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली.
-
भाजपाचे कार्यकर्ते आणि नेते पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी रस्त्यावर वाट पाहत उभी आहेत.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी दिंडोरी येथील सभा संपवून लगेचचं या मुंबईतील रोड-शो साठी उपस्थित राहणार आहेत.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारची कल्याणमधील जाहीर सभा आटोपून या रोड-शो साठी उपस्थित राहणार आहेत.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोच्या माध्यमातून भाजपा जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहे. या रोड-शो ला भाजपाचे दिग्गज नेते उपस्थित असणार आहेत.
-
दरम्यान या रोड-शोसाठी ‘मेट्रो १’च्या फेऱ्या काही वेळासाठी थांबवण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या सूचनेनुसार मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) ‘घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मेट्रो १’ मार्गिकेवरील जागृती नगर स्थानक – घाटकोपर स्थानकांदरम्यानची सेवा सायंकाळी ६ वाजल्यापासून पूर्णत: बंद करण्यात आली आहे.
-
तसेच, मुंबईतील अंधेरी घाटकोपर मार्गावरील घाटकोपर जंक्शन ते साकीनाका जंक्शन या दरम्यानच्या वाहतुकीत बदल करण्यात आल्याची माहिती आहे.
-
त्यामुळे कार्यालयातून घरी परतणाऱ्या प्रवाशांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. प्रचारासाठी सर्वसामान्यांना वेठीस का धरण्यात येत आहे, असा प्रश्न मुंबईकरांकडून उपस्थित केला जात आहे.
-
पंतप्रधान मोदी यांचा रोड शो विक्रोळी येथील अशोक सिल्क मिल्कपासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर त्रेयस टॉकिज, सर्वोदय सिग्नल, सीआईडी ऑफिस, सांघवी स्कवेर, हवेली ब्रिज आणि पार्श्वनाथ चौक येथे रोड शो संपणार आहे.
-
कार्यकर्ते ढोल ताशा घेऊन पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी उभे आहेत.
-
पंतप्रधानांच्या उत्साही समर्थकांनी त्यांची जागा नक्की करण्यासाठी शक्कल लढवली आणि झाडांच्या खोडांवर जाऊन बसले. यावेळी फोटोग्राफरने हे चित्र कॅमेरामध्ये कैद करुन घेतले. सर्व फोटो- (Express photos By Pradip Das and Deepak Joshi)

Pahalgam Terror Attack : गोळीबार सुरू होताच झाडावर चढून केलं संपूर्ण हल्ल्याचं रेकॉर्डिंग; स्थानिक व्हिडीओग्राफर बनला NIAचा प्रमुख साक्षीदार